Jalgaon : आयुक्तांच्या सेवानिवृत्तीनंतर नगरसेवकानं साजरा केला आनंदोत्सव; जळगाव महापालिकेत गोमूत्रही शिंपडणार होते, पण…

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आपल्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी नोटीस पाठवली. अशाप्रकारची वागणूक सहन करण्यापलिकडे असल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे.

Jalgaon : आयुक्तांच्या सेवानिवृत्तीनंतर नगरसेवकानं साजरा केला आनंदोत्सव; जळगाव महापालिकेत गोमूत्रही शिंपडणार होते, पण...
मनपा आयुक्तांच्या कार्यपद्धतीविरोधात नगरसेवकाची घोषणाबाजीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 11:36 AM

जळगाव : जळगाव आयुक्त सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवक नाराजी व्यक्त करत आले आहेत. त्याचे पडसाद त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात उमटल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. महापालिकेत आयुक्त (Commissioner) सतीश कुलकर्णी तसेच दहा कर्मचारी व अधिकारी हे सेवानिवृत्त होत असल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभाचे आयोजन जळगावात करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक (Corporator) चेतन सनकत यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल रोष व्यक्त केला. त्यांच्यासह इतर कार्यकर्तेही याठिकाणी आले होते. त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. त्यांनी काळे कपडे परिधान करून गोमूत्र फवारणीची तयारी केल्याने निरोप समारंभाला गालबोट लागले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली होती.

‘अन्यायकारक कारवाई केली’

नगरसेवक चेतन सनकत यांच्या या भूमिकेनंतर काही ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत घालत हा बेत रद्द केला. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीदेखील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून यापूर्वीदेखील महापालिका कर्मचाऱ्यांवर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अन्यायकारक कारवाई केली असल्याचा आरोप, नगरसेवक चेतन सनकत यांनी केला. रस्त्यावर खड्डे, कर्मचाऱ्यावंर कारवाई, सातवा वेतन आयोग यासह विविध मुद्द्यांवरून त्यांनी आयुक्तांवर टीका केली. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. त्यावरून सध्या मागील आठ दिवसांपासून कार्यवाहीही होत असल्याचे सनकत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

आयुक्तांच्या कार्यपद्धतीला विरोध

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आपल्या कर्मचाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी नोटीस पाठवली. अशाप्रकारची वागणूक सहन करण्यापलिकडे असल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. म्हणूनच सातत्याने मनपा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत. महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांचा निरोप समारंभ होत असताना मनपा प्रांगणात निषेधाची काळे कपडे परिधान करून आनंदोत्सव साजरा करत असल्याचे नगरसेवक चेतन सनकत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.