चालकाला डुलकी लागल्याने अपघात, पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडवले

पीकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने एका चौकात बसलेल्या चौघांना उडवले. यात दोघ जणांचे दोन्ही पाय निकामे झाले आहेत.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात, पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडवले
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 2:15 PM

जळगाव : पहाटे जास्त अपघात होतात. चालकाला डुलकी येते. तरी काही चालक पहाटे गाड्या चालवतात. अशावेळी सावधानता बाळगणे गरजेचे असते. पण, छोट्याशा चुकीमुळे अपघात होत असतात. पहाटे पाचची वेळ. पीकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने एका चौकात बसलेल्या चौघांना उडवले. यात दोघ जणांचे दोन्ही पाय निकामे झाले आहेत. या घटनेमुळे पहाटे उठून फिरायला जाणारे चांगलेच धास्तावले आहेत.

पीकअप-दुचाकीचा अपघात

पाचोरा तालुक्यात पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. भडगावकडून बुलढाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने चौघांना उडवले. शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री दत्त मंदिरासमोर ही घटना घडली. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासून निकामे झालेत. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या मदतीने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

JALGAON 2 N

या चौघांना उडवले

पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. भडगावच्या दिशेने बुलढाण्याकडे एमएचबीएम ७९४३ ही पिकअप भरधाव वेगाने जात होती. ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री दत्त मंदिरासमोर काही जण बसले होते. बसलेल्या वसंत भाईदास पाटील (वय ४२) रा. सुरत, विनोद पाटील (वय, ५०) रा. पाचोरा, अमोल वाघ (वय २७) रा. पाचोरा आणि कुंदन परदेशी (वय १७) रा. पुनगाव या चौघांना जोरदार धडक दिली.

दोन पाटलांचे दोन्ही पाय निकामी

धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत वसंत पाटील आणि विनोद पाटील यांचे गुडघ्यापासून दोन्ही पाय निकामे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या व सहकार्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपच्या ड्रायव्हर आणि किन्नरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.