जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; ठाकरे गटाचे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

जुन्या कार्यकर्त्यांना डावल्या जात असल्याच्या कारणाने ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढला. त्यामुळे सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; ठाकरे गटाचे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 3:51 PM

जळगाव : शिंदे गट वेगळा झाल्याने ठाकरे गटाने पक्ष वाढवण्यासाठी बरेच उपाय सुरू केलेत. ठाकरे गटाचे नेते राज्यात संघटना बांधणीचं काम करत आहेत. अशावेळी दुसऱ्या पक्षातून काही लोकं ठाकरे गटात येत आहेत. यामुळे जुने काही कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविकच आहे. असं काही जळगाव जिल्ह्यात घडतंय. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात आलं. ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील व युवा सेनेचे जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

या नेत्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जळगावमधील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील व युवा सेनेचे जिल्हा समन्वयक विश्वजित पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे जळगावमध्ये ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना जुन्या कार्यकर्त्यांना डावल्या जात असल्याच्या कारणाने ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढला. त्यामुळे सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटातून पडले बाहेर

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. सुषमा अंधारे यांनी त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. जळगावात तरुण तडफदार नेतृत्व म्हणून शरद कोळी नावाचा तरुण पुढं आला. पण, शरद कोळी यांचे वक्तृत्व हे जहरी असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मनोहर पाटील आणि विश्वजित पाटील हेही ठाकरे गटात होते. पण, त्यांनी आता ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.