पक्षप्रवेशाआधीच भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला; म्हणाले, जिल्ह्यातून त्यांना…
Chalisgoan MLA Mangesh Chavan on Ekanath Khadse and BJP : एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार; जळगाव भाजपमध्ये काय घडतंय? पक्षप्रवेशाआधीच भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला... खडसेंना टोला लगावणारा हा नेता कोण आहे? त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर....
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही वेळाआधी एकनाथ खडसे यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय शरद पवार यांचे आभारही खडसेंनी मानले आहे. त्यावर जळगावमधील स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. वरिष्ठांच्या निर्णयानंतर आणि एकनाथ खडसेंची पूर्णता वापसी झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील. खडसे भाजपमध्ये येत आहे. ते रस्त्यात आहेत. हे बॅग भरली आहे. बॅगेत शर्ट ठेवला. ते निघाले… अशा चर्चांना काही अर्थ नाही, असा खोचक टोला चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर लगावला आहे.
“त्या फक्त चर्चाच राहतील”
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवासी करतील, अशी चर्चा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगताना आपण पाहत आहोत. या चर्चेत रंग पूर्ण भरू द्या. नंतर त्यावर बोलणं उचित राहील. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे आणि ती फक्त चर्चाच राहील अशी शंका आम्हाला आहे. माध्यमांव्यतिरिक्त खडसेंचा भाजपात प्रवेश होणार या विषयाची कुठेही चर्चा नाही, असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.
” अमित शाहांना भेटल्याचा फोटो जुना”
एकनाथ खडसे यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो सात वर्षांपूर्वीचा आहे. एखाद्या जुन्या फोटोला वेगळा संदर्भ देणं, याला काही अर्थ नाही. एकनाथ खडसे लोटांगण घालत असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसेंनी पक्षात पुन्हा यावं अशी मागणी नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले.
संजय राऊतांवर निशाणा
आमदार मंगेश चव्हाण यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतला कुत्रं विचारत नाही. संजय राऊत यांची लायकी काय आणि ते बोलतात काय? संजय राऊतमध्ये वेडसरपणा सदृश्य लक्षणं दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ती लक्षणही वाढत आहेत. संजय राऊत यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक कॉट कायमस्वरूपी बुक करावा लागेल. अशी सध्या परिस्थिती आहे, असं चव्हाण म्हणाले.