बाटली आणि मटणचं एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य खडसेंनाच महाग पडणार

दिवसेंदिवस आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आता बंजारा समाजाकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडेच तक्रार करण्यात आली आहे.

बाटली आणि मटणचं एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य खडसेंनाच महाग पडणार
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 7:05 PM

खेमचंद कुमावत/जळगावः राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाज आता आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये भारतीय जनता पार्टी व बंजारा समाजाच्यावतीने आमदार एकनाथ खडसे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. एकनाथ खडसे यांनी लवकरात लवकर सकल बंजारा समाजाची माफी मागावी व राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना समज देण्यात यावी अशी मागणीही यावेळेस करण्यात आली आहे.

जळगावच्या जामनेरमध्ये एकनाथ खडसे एका कार्यक्रमात बोलताना बंजारा समाजाविषयी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात बंजारा समाजाचं दोन किलो मटन आणि एक बाटलीत होऊन जातं हे मी बघितला आहे.

या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

याआधीच जळगाव जिल्हा दूध संघाच्या भ्रष्टाचार प्रकरणी खडसे यांच्यावर जोरदाट टीका करण्यात आली होती. त्यातच आता बंजारा समाजाकडून मागील वक्तव्याचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखवल्याचे सांगत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून समज देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे हे प्रकरण खडसे यांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्याबद्दल एकनाथ खडसे यांनी माफी मागावी अशी मागणी आता करण्यात येऊ लागली आहे.

दिवसेंदिवस आता एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आता बंजारा समाजाकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडेच तक्रार करुन त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.