विरोधकांवर हल्लोबोल, स्वपक्षीयांना सुनावलं; देवेंद्र फडणवीसांचं ‘लाडक्या बहिणीं’ना संबोधन

DCM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. जळगावमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षीयांना सुनावलं आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

विरोधकांवर हल्लोबोल, स्वपक्षीयांना सुनावलं; देवेंद्र फडणवीसांचं 'लाडक्या बहिणीं'ना संबोधन
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 5:19 PM

जळगावममधील सागर पार्कमध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच महायुतीतील नेत्यांनाही सुनावलं आहे. जर तुम्ही महायुतीला आशिर्वाद दिला नाही. तर तुमच्याकडून 1500 रूपये काढून घेऊ, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. त्यांना फडणवीसांना भरसभेत सुनावलं आहे.

रवी राणांच्या विधानावर काय म्हणाले?

आमचे नेते गमतीगमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणतं की लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. पण अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते. निवडणुका येतात – जातात पण मला विश्वास आहे. बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. जो पर्यंत आमचं त्रिमूर्तींचं सरकार सत्तेत आहे. तोवर बहिणींसाठीची ही योजना कुणाचा बापही बंद करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांना टोला

रोज हे नवीन नवीन खोटं सांगतात हे खोटं सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दात सांगतो. काही लोक खोटं बोलून बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत संविधान बदलल्याबद्दल खोटं विरोधकांनी पसरवलं. ज्या ठिकाणी चंद्राने सूर्या जोपर्यंत आहे. तोपर्यंत कोणी आरक्षण संपवू शकत नाही. निवडणूक आल्या काय हे खोटो पसरवण्याचे काम करतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

महिला सक्षम झाल्या तर महाराष्ट्राला कोणीच थांबू शकणार नाही. सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण करत आहे. मुख्यमंत्री महोदय जळगावच्या रस्त्यांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये द्यावे अशी आमच्या जळगाव मधल्या नेत्यांची मागणी आहे. नाळपार योजनेच्या संदर्भात कोणाच्या मनात शंका असेल तर ते काढून टाकावं. यासंदर्भात मी राज्यपालांचे भेट घेतलेले आहे नागपंच पाणी शेतकऱ्यांना भेटण्यासंदर्भात कोणीच थांबू शकत नाही. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे अनेक प्रकल्प आपण मार्ग लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. बहिणींच्या प्रेमाचं कवच आहे. त्यामुळे आमचं कोणीच काही वाकड करू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.