राजकीय दबावापोटी नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई, एकनाथ खडसे यांचा आरोप
जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी नगरपालिकेतील सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली.
जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळाची वाट पाहत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जस जसा उशीर होतोय तस तशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आताही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. अशी टीका राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. तर गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) एक हजार कोटींचे काम रद्द केलीत.त्यामुळं सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.
भुसावळ नगरपालिकेतील खडसे समर्थक माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांवर सहा वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आली. एकनाथ खडसे यांना राज्य सरकारचा मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी नगरपालिकेतील सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली.
याप्रकरणी शासनाकडे दाद मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिल्याची खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना जळगावात मोठा धक्का बसला. भुसावळमधील खडसे समर्थक दह नगरसेवक सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. नगरविकास विभागाच्या सचिवांनी निलंबनाचे आदेश काढले. यामुळे खडसे यांनी सत्तेत असलेल्यांवर टीका केली.
यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदार मंत्रिपदासाठी वाट पाहत आहेत. त्यांची अस्वस्थता वाढली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याची वाट पाहत असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.