खडसेंचं गुलाबरावांना उत्तर, ”मी टपरीटुपरीवर कामाला नव्हतो, त्यामुळे मला कुणाला….”
नाथाभाऊ आणि गुलाबराव यांची जळगावात एकमेकांवर टीका करण्याची चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.
जळगाव : मुक्ताईनगरमध्ये काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली यात गिरीशभाऊ आणि गुलाबभाऊ, या दोन्ही भाऊंनी नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांना टीकेसाठी चांगलंच घेरलं. यात एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेवर नाव न घेता उत्तर दिलं आहे. eknath khadse to gulabrao patil गुलाबराव यांनी नाथाभाऊंवर चुना लावण्याची टीका केली होती. eknath khadse या टीकेला नाथाभाऊंनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. gulabrao patil असं म्हणतात की जळगाव ग्रामीणचे शिवसेनेकडून निवडून आलेले, सध्या शिंदे गटात असलेले आमदार गुलाबराव पाटील हे पानवाले होते, त्यांची पानाची टपरी होती.
जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी काल मुख्यमंत्र्यांसमोर जी टीका एकनाथ खडसे यांच्यावर केली. त्या टीकेला एकनाथ खडसे यांनी उत्तर देताना काय म्हटलं आहे, यातील महत्त्वाचे मुद्दे खाली वाचा
‘हो मी अनेकांना चुना लावला, मी भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलपर्यंत मी पाठवलं.”
”यात जे प्रामाणिक होते, त्यांना माझी भीती वाढली नाही, जे नव्हते त्यांना माझी भीती वाटली. मी कुणावलं बुडवलं, फसवलं नाही. मी माझ्या बापजाद्यापासून श्रीमंत आहे.”
”माझ्या आईवडिलांपासून माझी आर्थिक स्थिती चांगली आहे. मी कोणत्या टपरीटुपरीवर काम करणारा नव्हतो, त्यामुळे मला कुणाला चुना लावण्याची गरज भासली नाही, जे आहे ते माझ्याकडे वडलोपार्जित आहे.”