गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे

एकनाथ खडसे (Eknath Khadse), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahjan) हे तीन बडे नेते एकमेकांचं वाक्य खाली पाडू देत नाहीयेत. खडसेंनी बाण सोडला की त्याला गुलाबराव उत्तर देत आहेत. गुलाबराव पाटलांनी बाण सोडला की त्याला खडसे उत्तर देत आहेत. तर दुसरीकडे गिरीश महाजन-खडसे यांचं वाकयुद्धही जोरात सुरू आहे.

गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे
एकनाथ खडसे, आणि गुलाबराव पाटील यांच्यातला वाद वाढला.
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 9:31 AM

जळगाव : राज्याच्या राजकारणात जसा वार-पलटवारांना उत आलाय, तशीच काहीशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रच्या राजकारणातही सुरू आहे. कारण एकनाथ खडसे (Eknath Khadse), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahjan) हे तीन बडे नेते एकमेकांचं वाक्य खाली पाडू देत नाहीयेत. खडसेंनी बाण सोडला की त्याला गुलाबराव उत्तर देत आहेत. गुलाबराव पाटलांनी बाण सोडला की त्याला खडसे उत्तर देत आहेत. तर दुसरीकडे गिरीश महाजन-खडसे यांचं वाकयुद्धही जोरात सुरू आहे. त्यामुळे आत्ताची घडीला उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची धग वाढलीय. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवरून हे नेते पुन्हा तापले आहेत. याची सुरूवात झाली गिरीश महाजन यांच्या आघाडी बैठकीवरून आणि बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून. हा वाद आता रोज वाढत चालला आहे. सकाळीच गुलाबरावांनी खडसेंचा समाचार घेतला, त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी बाळ एकाचे, बारसं दुसऱ्याचे, आणि डफडं गुलाबरावांचं म्हणत निशाणा साधला आहे.

गुलाबरावांचं नावचं खराब

गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही, असे वक्तव्य केले होते यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार करत गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. जिल्ह्यातील विकास कामावरून बोलताना बाळ कुणाचे, बारसा कुणाचे, मात्र डफडं ते वाजवत असल्याचे म्हणत खडसेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचे नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका. असा इशाराही खडसेंनी दिलाय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसत आहे.

रक्षा खडसे-गुलाबराव पाटलांची भेट चर्चेत

दरम्यान अजूनही जळगावात राजकीय भेटीगाठींचे चर्चासत्र सुरूच आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची जळगाव येथे अजिंठा विश्रांती भेट घेतली. मुक्ताईनगर येथे काँग्रेस व शिवसेनेची बंदद्वार बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच भाजप खासदार रक्षा खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसापासून गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय युद्ध सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरली. मात्र मी सर्वांची कन्या आहे. त्यामुळे ह्या सर्व वादापासून मी दूर असल्याचे रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही, असे थेट चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती अशी प्रतिक्रिया देत थेट एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला.

सुशांतसिंग, दिशा सालियान प्रकरणात महापौरांचं राज्य महिला आयोगाला पत्र, मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल देण्याचे आदेश

केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला

प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त, आठवलेंचा पुन्हा खोचक टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.