Eknath Khadse : भाजपत जाण्याची चर्चा, पण मोदींच्या कार्यक्रमाचं नाथाभाऊंनाच निमंत्रण नाही, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचे काय होणार?
Eknath Khadse BJP Joining : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी स्वतः याविषयीची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जळगावमध्ये आहेत. पण नाथाभाऊंनाच या क्रार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेले नाही.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचे घोंगडे अजूनही भिजतच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. पण अद्याप या केवळ चर्चा असल्याचे समोर आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण लखपती दीदी या कार्यक्रमाचं एकनाथ खडसे यांना निमंत्रणच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाचं काय होणार, याची कार्यकर्त्यांना चिंता लागली आहे.
दोन महिन्यांपूर्वी घेतली होती शाह यांची भेट
नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते आहेत. मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. ते राष्ट्रवादीत गेले. पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी उघड केले होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जून महिन्याच्या अखेरीस दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हापासून नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते होते.
मोदी यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही
नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय कार्यक्रम आहे. त्याचं कुठल्याही निमंत्रण आमदार म्हणून मला दिलेले नाही.त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार नाही. शासकीय निमंत्रण नसल्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती. नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितले. सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधन कारक असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी माहिती
वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र आता यावेळी जर निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांना निमंत्रण देण्यात न आल्यामुळे प्रशासनाचा उदासीन कारभार समोर आला आहे. आमदार असताना सुद्धा एकनाथ खडसे यांना निमंत्रण का देण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.