जळगाव : आपल्यापैकी अनेकांना गुडखेदुखी (Joint pain) आणि सांधेदुखीचा त्रास असेल. यावर आपण रोज नवनवीन उपाय शोधत असतो. हजारो रुपये ओषधांना (knee pain) खर्च होता. त्यासाठी अनेकांना डॉक्टरचे उंबरे झिझवावे लागतात. तरीही काही जणांचा गुडघ्यांचा त्रास जात नाही. हा त्रास फक्त सर्वसामान्य माणसांनाच नाही. तर अनेक नेतेमंडळीलाही आहे. गेली काही वर्षे गुडघेदुखी व पाठदुखीच्या आजाराने त्रस्त असलेले एकनाथ खडसे यांना अनोख्या उपचारपद्धतीने दिलासा मिळाला आहे. मधमाशी थेरपी नावाच्या उपचार पद्धतीमुळे मधमाशीच्या चाव्याने एकनाथ खडसे (Eknath Khadase) गुडघ्याच्या व पायाच्या आजारातून मुक्त झाले आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल की मधमाशी चावल्यावर सूज येते तर उपचार कसे होणार? त्याचेच उत्तर आम्ही घेऊन आलोय.
दोन सेकंदात बरे करण्याची हमी
मधुमक्खी थेरपी त्यांना कशा पद्धतीने या उपचारामुळे दिलासा मिळाला आहे. याबाबत मधुमक्खी थेरपी चे तज्ञ डॉ. अनमोल नांदेडकर यांनी माहिती दिली आहे. यात ते दोन सेकंदात बरे करण्याची हमी देतात. मधमाशी चावण्यासाठी केवळ दोन सेकंद लागतात. मधमाशीच्या डंकाद्वारे शरीरामध्ये एक प्रकारचे स्टेरॉईड जातात. त्यामुळे दुखणे थांबल्याचा दावा केला जातो. आरोग्याचा समतोल राखण्यासाठी आयुर्वेदिक होमिओपॅथिक ऍलोपॅथी यासारखे अनेक जण औषध उपचार करतात व त्यातून आपले आरोग्य जतन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या अनोख्या उपचार पद्धतीने नैसर्गिक उपचाराचा फायदा खडसेंना झाल्याने इतरांनी या उपचाराचा अनुभव घ्यावा असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.
खडसे थेरपीबद्दल काय म्हणाले?
गेल्या अनेक दिवसांपासून मला गुडघेदुखीचा त्रास होता. अगदी मला चालणेही शक्य होत नसे कधी कधी…यावर अनेक ठिकाणी उपचार केले. देशभरातले डॉक्टर फिरलो. व्हिलचेअरवरही बसलो. मात्र तरीही काही फायदा झाला नाही. त्यानंतर या डॉक्टरांनी सांगितलं दोन सेकंदात तुम्हाला बरे करतो म्हणाले. या थेअरपीमुळे मी बरा झालो, अशी प्रतिक्रिया यावेळी खडसेंनी दिली आहे. या आजारांनी अनेकजण त्रस्त आहेत. अनेकांना हजारो रुपये घालवून यावर उपाय निघत नाही, मात्र ही थेअरपी अगदी स्वस्तात केली जाते.
Video : अनिल बोंडे पोलिसांवर पुन्हा भडकले! आवाज चढवत म्हणाले ‘कोण बोलतेय ती?’