Eknath Khadse : 37 दिवस झाले तरी शिंदे सरकारचा पोरखेळपणा सुरूच, फायलींचा ढिग मुख्यमंत्र्यांकडे, एकनाथ खडसे यांचा घणाघात

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळ तयार झालं नाही.

Eknath Khadse : 37 दिवस झाले तरी शिंदे सरकारचा पोरखेळपणा सुरूच, फायलींचा ढिग मुख्यमंत्र्यांकडे, एकनाथ खडसे यांचा घणाघात
फायलींचा ढिग मुख्यमंत्र्यांकडे, एकनाथ खडसे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 10:19 PM

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. या राज्यात अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. शिंदे सरकार अस्तित्वात नाही. 37 दिवस झाले सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे, अशी टीका खडसे यांनी केली. शिंदे सरकारचं अजून मंत्रिमंडळ नाही. दोघांचा कारभार सुरू आहे. एक मुख्यमंत्री (Chief Minister) आहे तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आहे. त्यांच्याकडे एकही खाते नाही. साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढिग लागतोय. शिंदे सरकारचे अडीच वर्षे बाकी आहेत. मला असं वाटत नाही की, सरकार अडीच वर्ष टिकेल. एक वर्षात निवडणुका (Elections) लागल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. निर्णय घ्यायला या राज्यात कोणी नाही. राज्यातील जनता हवालदिल आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्याप्रसंगी मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.

राज्यातील विकासकामे रखडली

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळ तयार झालं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाच कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडं फायलींचा ढिग असतो. उपमुख्यमंत्री तर बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळं राज्यातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकारकडं अडीच वर्षांचा वेळ बाकी आहे. परंतु, अजून इतर मंत्र्यांनी शपथ घेतली नाही. एक महिना ओलांडला, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे सरकार अडीच वर्षे चालेल, असं वाटत नसल्याचं खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यात निर्णय घेणार फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळं एकूण किती दिवस हे सरकार टिकेल, काही सांगता येत नाही. या सरकारचा काही भरोसा नाही, असंही खडसे म्हणाले. एकंदरित कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असाच काहीसा संदेश एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.