आता शेतीची वीज कापता येणार नाही, कारण शेतकरी अन्नधान्य जगासाठी पिकवतो, हे आणखी एकदा सिद्ध…

अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणाला शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापू नये, असा आदेश दिला आहे.

आता शेतीची वीज कापता येणार नाही, कारण शेतकरी अन्नधान्य जगासाठी पिकवतो, हे आणखी एकदा सिद्ध…
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 8:18 PM

जळगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी योग्य पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. राज्यात सातत्याने आस्मानी संकट, ओला आणि कोरडा दुष्काळ यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षात नाजूक झालीय. या दरम्यान वीजबिलाच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या शेतातील वीज महावितरणाकडून कापली जात होती. वीजपंपाची वीज कापली गेल्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांच्या या समस्येवर राज्य अन्न आयोगाने मोठा निकाल जाहीर केला आहे. या निकालातून अन्न आयोगाने महावितरणाला शेतकऱ्याच्या शेतातली वीज न कापण्याची सूचना वजा आदेशच दिला आहे. त्यामुळे महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही.

महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या आदेशाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे वीज कंपन्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश आयोगाने महावितरण विभागास दिला आहे. अन्न कायद्यानुसार दाखल याचिकेत आयोगाने निकाल जाहीर करत संबंधित आदेश दिलाय. या निकालामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

हे सुद्धा वाचा

लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित करण्या विरोधात अन्न आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देत अन्न आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना कुठल्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये असा आदेशच दिलाय.

“शेतकऱ्याच्या शेतीचं वीज कनेक्शन कापलं गेलं तर शेतातील उभं पीक नष्ट होतं. त्यानंतर शेतातून कुठलंही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे अन्न नष्ट होतं. ती राष्ट्रीय संपत्ती आहे, ती संपत्ती नष्ट होते. त्यामुळे पीक निघेपर्यंत तरी वीज कनेक्शन कट करु नये, राज्य अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत निकाल दिला आहे की, शेतामध्ये पीक उभं असेपर्यंत कोणत्याही शेतीचं वीज कनेक्शन काढू नये. या निकालाचं आम्ही स्वागत करतो. लोकप्रतिनिधींना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी विनंती कतो”, अशी प्रतिक्रिया सचिन धांडे यांनी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.