अर्थसंकल्पाचा सराफा बाजारावर परिणाम; सोने-चांदीचे दर हजारो रूपयांनी कोसळले

Gold and Silver Rate After Budget 2024 : आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर सोने चांदीच्या भावात मोठे बदल झाले आहेत. सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे. सराफा बाजारात हजारो रूपयांनी सोन्याचे दर कोसळले आहेत. काय आहेत सध्या सोन्याचे दर? वाचा सविस्तर बातमी....

अर्थसंकल्पाचा सराफा बाजारावर परिणाम; सोने-चांदीचे दर हजारो रूपयांनी कोसळले
gold rate today
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 7:27 PM

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात विविध सेक्टरसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा सराफा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने- चांदीचा भाव हजारो रूपयांनी कोसळला आहे. सोन्या चांदीचे दर तब्बल तीन हजारांनी घसरले आहेत. त्यानंतर ग्राहकांनी सोन्या- चांदीच्या दुकानात मोठी गर्दी केली आहे. जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली आहे.

इतक्या हजारांनी घसरला सोन्याचा दर

देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात दागिन्यांवरील कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचा भाव कमी झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दर तब्बल तीन हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याच्या बातमीनंतर जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

जळगावात किती आहे सोन्याचा दर?

देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या व चांदीवरील कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णन नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही तीन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 73 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण

गेल्या एक ते दीड महिन्यानंतर तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल तीन हजार रुपयांनी दर घसरल्यामुळे मोठा आनंद होत असल्याच्या महिला ग्राहकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बजेटमध्ये नसलेलं सोनं आता मात्र ग्राहकांना थोड्या कमी दरात मिळत आहे. हे सोनं आता बजेटमध्ये आल्याने सोनं खरेदी करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केलीय.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल तीन हजार रुपयांनी सोन्याने चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शंका असल्यामुळे ग्राहकांनी आजच सोनं खरेदीसाठी केली सराफाच्या दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.