अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर शिवसेनेच्या मंत्र्याचा टोला; म्हणाले, प्रत्येकाने गुलाबी शर्ट…

Gulabrao Patil on Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याने अजित पवारांना टोला लगावला आहे. जळगावमध्ये बोलताना त्यांनी अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर भाष्य केलं आहे. तसं उपमुख्यमंत्रिपदावरूनही त्यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. वाचा सविस्तर......

अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर शिवसेनेच्या मंत्र्याचा टोला; म्हणाले, प्रत्येकाने गुलाबी शर्ट...
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 6:13 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गुलाबी जॅकेट घालून असतात. जनसन्मान यात्रेतही ते गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. काही काही लोकांना रंग हा लकी असतो. त्यातल्या त्यात गुलाबी…. आणि माझ्या नावात सुद्धा गुलाब आहे. शेवटी हा ज्याचा त्याचा विषय आहे. मी काही ज्योतिषी नाही. आपल्याकडे आता जिह्यात मुख्यमंत्री येणार आहेत. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की प्रत्येकाने गुलाबी शर्ट घालावा… पण हा विनोदाचा भाग आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्या गुलाबी यात्रेवर टोला लगावला आहे.

अजित पवारांना टोला

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी सीनियर आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आमदार सोबत आणल्याने त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री केला असता तर मी संपूर्ण पक्ष आणला असता अस वक्तव्य केलं होतं. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. आम्ही अजितदादा पवार यांचा आदर करतो. पाच वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. सकाळी सकाळी सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी अजितदादांना टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

पुण्यातील जागेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारचे कान उघाडणी केली आहे. लाडकी बहीण योजनेत द्यायला पैसे आहेत आणि जमिनीचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. त्यावर गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने काय निर्देश द्यावे हा त्यांचा विषय आहे. मात्र त्याकरता योजना थांबवणे हे कुठल्याच कायद्यात बसत नाही. त्यामुळे सरकार आहे. सरकार निश्चितच त्या विषयावर सुद्धा काहीतरी मार्ग काढेल. त्यामुळे सरकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश सुद्धा पाडेल आणि लाडक्या बहिणींना सुद्धा खुश करेल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

काहीच महिलांच्या खात्यामध्ये तपासणीसाठी एक रुपया टाकण्यात आला होता. सर्व महिलांच्या खात्यात पाठवले नव्हते. शंभर टक्के महिलांच्या खात्यावर एक रुपया टाकण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.