‘त्या’ व्यक्तीने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संपवला; गुलाबराव पाटलांनी घेतलं मोठ्या नेत्याचं नाव

Gulabrao Patil on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संजय राऊतांमुळे फुटल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसंच त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

'त्या' व्यक्तीने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संपवला; गुलाबराव पाटलांनी घेतलं मोठ्या नेत्याचं नाव
मंत्री गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:00 PM

मागच्या दोन अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. हे पक्ष फोडण्यामागे मोठ्या नेत्याचा हात असल्याचं शिवसेनेचे वरिष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. सर्वात पहिले तर संजय राऊतला अॅडमिट केले पाहिजे. या माणसाने शिवसेना संपवली.. शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरेंना संपवलं. राहिला सुरल आता तो स्वतः संपणार आहे. त्यामुळे तो मेंटल झाला आहे पागल झाला आहे… त्याच्या हातात दगड द्या. दगड घे हातात म्हणा आणि फिर मला भिवंडीच्या बाजारात.., अशा शब्दात माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितला आहे की माझा कुठलाही अडचणीचा विषय नाही. हा विषय त्यांनी संपून टाकलेला आहे. यापुढे एकनाथ शिंदे साहेबांना सर्व अधिकार शिवसेना पक्षाचे वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जेही निर्णय होतील.. ते सर्व एक छत्री.. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील.. असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलाय, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केलं आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं मत पाटलांनी मांडलं. सर्वसमावेशक काम एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळे.. सगळ्या घटकांची कामे केल्यामुळे सहाजिकच जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. मात्र या विषयात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा कुठलाही अडचणीचा विषय नाही या शब्दात हा विषय खोडून टाकला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांना अडचणीला असं कुठल्याही पद्धतीचे वक्तव्य मी करणार नाही. ते जे निर्णय घेतील. ते मला मान्य राहणार आहे असं त्यांनी सांगितलं असल्याचं गुलाबराव पाटील म्हणालेत.

गुलाबराव पाटील यांच्या नावाने जळगावमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. त्यावर शेवटी कार्यकर्ते उत्साही असतात.. शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्याचं नाव एकनाथराव जी शिंदे आहे… त्या आदेश करतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो.. पुढच्या काळातही आम्ही त्याच पद्धतीने काम करत राहू, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.