Jalgaon Accident : जळगावमध्ये दुचाकीचे पंचर काढायला चाललेल्या इसमांवर काळाची झडप, कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

भडगावच्या यशवंतनगर भागातील दीपक सोनवणे यांची बाईक पंचर झाली होती. यासाठी त्यांनी आपल्या मुलाला पंचर काढून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार सोनावणे यांचा मुलगा अमोल सोनावणे आणि त्याचा मित्र पंकज भोई हे पंचर काढण्यासाठी दुचाकी ढकलत घेऊन चालले होते.

Jalgaon Accident : जळगावमध्ये दुचाकीचे पंचर काढायला चाललेल्या इसमांवर काळाची झडप, कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू
अमोल सोनावणे आणि पंकज भोई
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 5:46 PM

जळगाव : पंचर काढायला दुचाकी ढकलत घेऊन जात असताना समोरुन येणाऱ्या कार (Car) ने जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगवामधील भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर घडली आहे. दोन मित्रांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अमोल दिपक सोनवणे  आणि पंकज भारत भोई अशी अपघाता (Accident) त ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही भडगावमधीलच रहिवासी आहेत. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Husband and wife die on the spot in dumper and two-wheeler accident in Jalgaon)

दुचाकीचे पंचर काढण्यासाठी चालले होते तरुण

भडगावच्या यशवंतनगर भागातील दीपक सोनवणे यांची बाईक पंचर झाली होती. यासाठी त्यांनी आपल्या मुलाला पंचर काढून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार सोनावणे यांचा मुलगा अमोल सोनावणे आणि त्याचा मित्र पंकज भोई हे पंचर काढण्यासाठी दुचाकी ढकलत घेऊन चालले होते. यावेळी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आसपास हॉटेल राज पॅलेस जवळ समोरुन येणाऱ्या इको गाडीने या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी पंकजला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल विजय जाधव हे करीत आहेत.

नाशिकमध्ये पती-पत्नीला डंपरने चिरडले

नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून घरी चाललेल्या पती-पत्नीला नाशिकरोड येथे डंपरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. विठ्ठल घुगे (49) आणि सुनीता घुगे (47) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. मखमलाबाद येथून नातेवाईकांच्या अंत्यविधीवरुन परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावर घुगे दाम्पत्याच्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने चिरडले. या अपघातात दोघांता जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घुगे दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (Husband and wife die on the spot in dumper and two-wheeler accident in Jalgaon)

इतर बातम्या

Mumbai Crime : टकटक गँगच्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

Nagpur Crime | नागपुरात खंडणी प्रकरणी चार आरोपी जेरबंद, आरोपीने हवालाचे तीस लाख पाठविले?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.