जळगावमधील सभेत आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेत अमित शहा म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावमधील सभेत बोलतावा मविआला पंक्चर असलेली रिक्षा म्हटलं आहे. इतकंच नाहीतर शरद पवार यांना 50 वर्षे सहन केल्याचं म्हणच शहा यांनी सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंची नावे घेत पाहा काय टीका केली.

जळगावमधील सभेत आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेत अमित शहा म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 5:27 PM

जळगाव | आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगावमधील सागर पार्कमध्ये भाजप युवा संमेलनामध्ये बोलताना घराणेशाहीवर टीका केली. महाराष्ट्रातील जनता शरद पवार यांना 50 वर्षे झेलत असल्याचं म्हणत त्यांनी आपल्या भाषणामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांची नावं घेत निशाणा साधला.

काय म्हणाले अमित शाह?

सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवलं आहे. महान भारताचं टार्गेट ठेवलं आहे. मोदींनी दहा वर्ष भारताला सुरक्षित ठेवण्याचं काम केल्याचं अमित शाह म्हणाले.

सोनिया-मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये बॉम्बस्फोट होत होते. मोदी आले आणि त्यांनी पुरी आणि पुलवामातील घटनेचा दहा दिवसात बदला घेतला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. 370 कलम रद्द केलं. मोदींनी काश्मीरला भारताला जोडलं. काँग्रेसने 370 कलमवरून लटकवत ठेवलं. तुम्ही दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान केलं त्यांनी 370 कलम रद्द केल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.

राहुल बाबांना ओळखता ना. ते मला संसदेत म्हणायचे 370 कलम हटवू नका. रक्ताच्या नद्या वाहतील असं राहुल गांधी म्हणायचे. राहुल बाबा 370 कलम हटवलं. पाच वर्षात रक्ताच्या नद्या सोडा, साधा दगडही उगारला गेला नाही. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसने म्हणाले, अर्थतज्ज्ञ पंतप्रधान बनवलं. वाजपेयींनी देशाला 11 व्या नंबरची अर्थव्यवस्था केलं. काँग्रेसने देशाला 11व्याच नंबरला ठेवलं. मोदींनी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था केल्याचं शहांनी सांगितलं.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.