Jalgaon Suicide : जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्या, घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने उचलले टोकाचे पाऊल

मयत तरुण तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Jalgaon Suicide : जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्या, घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने उचलले टोकाचे पाऊल
जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 4:25 PM

जळगाव : एका प्रेमी युगुला (Couple)ने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी सकाळी रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी येथे घडली आहे. मुकेश पवार (25) आणि गायत्री पवार (20) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. मयत तरुण तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. रावेर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (In Jalgaon a couple committed suicide by hanging themselves after their family members opposed their marriage)

रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी गावाजवळील एका शेतातील झाडाला गळफास घेत या जोडप्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

मालेगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगावातील कळवणच्या अभोना येथे घडली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने आपण इस्कॉन संस्थेचे काम करतो, आपणास संन्यास घायचा आहे. फक्त हळद लावण्यापुरतेच आपण लग्न केले.आपण वैवाहिक संबंध ठेवू शकत नसल्याचे सांगत पती मारहाण करत वारंवार छळ करीत होता. अखेर पत्नी विशाखा शैलेश येवले हिने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून महिला माहेरी निघून गेली. मात्र माहेरच्यांनी समजावून पुन्हा सासरी नांदायला पाठवले. मात्र सासरचा छळ थांबत नव्हता. यामुळे अखेर महिलेने टोकाचे पाऊल उचलले. (In Jalgaon a couple committed suicide by hanging themselves after their family members opposed their marriage)

इतर बातम्या

Jaipur : जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आग, इमारतीत लोक अडकली असल्याची भीती

VIDEO : सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडले, 27 लाखांची रोकड लंपास

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.