शाळेत मुलांना घेऊन चालली होती स्कूल बस, अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला अन्…

नेहमीप्रमाणे विद्यार्थी स्कूल बसने सकाळी शाळेत जायला निघाले. शाळेपासून 5 किमी अंतरावर येताच बसला अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

शाळेत मुलांना घेऊन चालली होती स्कूल बस, अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला अन्...
जळगावमध्ये स्कूल बस पलटलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:06 AM

जळगाव / अनिल केऱ्हाळे : बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने स्कूल बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये आज सकाळी घडली. या अपघातात 30 हून अधिक विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. जळगाव जिल्ह्यातील पहुर – शेंदुर्णी दरम्यान स्कूल बस उलटून अपघात झाला. जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

शाळेपासून 5 किमी अंतरावर अपघात घडला

शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेची ही बस आहे. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे चालली होती. याचवेळी पहुर-शेंदुर्णी दरम्यान बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्यावर पलटली. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यावेळी बसमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. बस पलटल्याने सर्व जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही.

स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य केले

अपघात घडताच स्थानिक रहिवासी तात्काळ धावत आले. स्थानिकांनी बसमधील विद्यार्थी, शिक्षकांना बाहेर काढून खाजगी वाहनातून रुग्णालयात नेले. पहूर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पहूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.