“संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या रक्ताने उभा राहिलेल्या भगव्याला लाथाळलं”; शिवसेनेच्या नेत्याने राऊतांना खडसावून सांगितलं

संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये तसेच अजित पवार यांनीही याच शब्दात त्यांनी त्यांना सुनावताना सांगितले की, कोणाला तोंड खूपसण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या रक्ताने उभा राहिलेल्या भगव्याला लाथाळलं; शिवसेनेच्या नेत्याने राऊतांना खडसावून सांगितलं
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 9:17 PM

खेमचंद कुमावत/जळगाव : राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्यातरी ठाकरे गट आणि शिवसेनेचे वाकयुद्ध थांबायचे नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी चौकटीत राहून बोलावं नाहीत सभेत घुसू असा इशारा दिला होता. गुलाबराव पाटील यांच्या टीकेनंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

त्यावर एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील हे कुठे चौकटीत राहून बोलतात अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला होता. तर आता पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांनी त्याविषयावरून संजय राऊत यांना खडसावून सांगितले.

खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केल्यानंतर त्यांची बाजू घेऊन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरूनच आता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना बोलण्याटा काही प्रमाणात आम्हाला अधिकार आहे, मात्र ज्या संजय राऊत यांनी शिवसेना फोडली त्या संजय राऊंतांना आम्हाला बोलण्याचा कोणताही अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

ज्यांनी आमची 41 मतं घेऊन खासदारकी मिळवली आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका करताना त्यांनी चौकटीत राहून बोलावं असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर बोलताना म्हणाले की, मी त्यांच्या सभेत घुसणार नाही,तर आधी सरदार नंतर सैनिक जात असतात अशा शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आज जे आहे ते मी सगळं शिवसेनेत शिकलो आहे आणि मी शिवसेनेतच आहे असंही त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला फसवलं त्या माणसाच्या तोंडून आता घाण ऐकणे उचित नसल्याचा घणाघात त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

तसेच संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या रक्ताने उभ्या राहिलेल्या भगव्याला लाथाळलं असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.त्यामुळे त्यांनी भगव्याला लाथाळलं आहे याचंच दुःख जास्त आहे अशा शब्दात त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आजचा गुलाबराव पाटील आहे तो फक्त शिवसेना या चार शब्दांमुळे उभा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आम्ही पोलिसांच्या लाट्या-काट्या खाऊन मोठे झालो. आम्ही निवडून आलो म्हणून तुम्ही मोठे झाला आहात.

त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये तसेच अजित पवार यांनीही याच शब्दात त्यांनी त्यांना सुनावताना सांगितले की, कोणाला तोंड खूपसण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.