Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ
साकेगाव येथील वाघूर (Waghur) नदीवरील रेल्वेचा पूल आहे. या परिसरात नदीकाठावर सुमारे दहा ते बारा वर्षांच्या मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केल्यावर मृतदेह कुजल्याचे लक्षात आले.
जळगावः साकेगाव (Sakegaon) येथे रेल्वे पूर परिसरात वाघूर नदी काठावर एका बारा वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खबळ उडालीय. हा मृतदेह (Dead body) नेमका कोणाचा आहे, तो नदीपात्रात कसा आला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. साकेगाव येथील वाघूर (Waghur) नदीवरील रेल्वेचा पूल आहे. या परिसरात नदीकाठावर सुमारे दहा ते बारा वर्षांच्या मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केल्यावर मृतदेह कुजल्याचे लक्षात आले. दरम्यान, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची नोंद मध्यंतरी झाली होती. त्यानुषंगाने तेथील पालकांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. मात्र, मृत मुलगा त्यांचा मुलगा नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी केले अंत्यसंस्कार…
भुसावळ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी व सहकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांनी परिसरातील विविध गावांमध्ये माहिती देऊन कुणाचा मुलगा हरवला आहे का? याचा शोध घेतला. पण, उपयोग झाला नाही. दरम्यान, नियमानुसार अनोळखी मृतदेह तीन दिवस जतन करून ठेवण्याच्या स्थितीत नव्हता. यामुळे पोलिसांनी साकेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सायंकाळी अंत्यसंस्कार केले. भानखेडा येथील पोलिस पाटील शरद पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली. एपीआय प्रकाश वानखेडे, जगदीश भोई हे तपास करत आहेत.
पालकांना केले आवाहन…
जळगाव पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांना पोहण्यासाठी एकटे सोडू नका, असे आवाहन केले आहे. अनेक लहान मुले उन्हाळ्यात घराबाहेर पडतात. काही जणांना पोहता येत नसते. तरीही ते नदीपात्रात आणि विहिरीत अंघोळ करण्यासाठी जातात. यामुळे अनर्थ ओढवू शकते. हे टाळण्यासाठी आपली मुले दिवसभर घराबाहेर असतात. तर ते काय करतात, यावर पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!