माझ्या हातात, मनात आणि डोक्यात फक्त कमळ…; ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारीची आशा

BJP Candidacy Vidhansabha Election 2024 : सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अनेक नेते उमेदवारी मिळावी म्हणून उत्सुक आहेत. एका नेत्याने भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे. तसंच आपल्याला उमेदवारी मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय.

माझ्या हातात, मनात आणि डोक्यात फक्त कमळ...; 'या' बड्या नेत्याला उमेदवारीची आशा
भाजपImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 1:19 PM

राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीत कामाला लागलेत. अशातच अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. भाजप उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार आहे. उद्या भाजपची पहिली यादी येणार आहे. अशातच जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांनी टीव्ही 9 मराठीश बोलताना उमेदवारीची मागणी केलीय. माझ्या हातात आणि मनात आणि डोक्यात कमळं आहे. जळगाव शहरातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, असा विश्वास विद्यमान भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे.

भोळे यांना उमेदवारी मिळण्याचा विश्वास

भाजपची उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. यात जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? यावर चे आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया दिली. जळगाव शहरातून तिसऱ्यादा उमेदवारी मिळेल. कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल, असं भोळे म्हणालेत. माझ्या हातात आणि मनात आणि डोक्यात कमळं आहे. त्यामुळे पक्षाचे आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाने सांगितलं थांब तर मी 100% थांबणार आहे, असंही ते म्हणालेत.

मी 25 ते 30 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठीचे नेतृत्वाचे जे आदेश असतील ते मानणारा मी कार्यकर्ता आहे. 25- 30 वर्षांपासून काम करत असताना जनतेची सेवा करतोय. त्यातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा जनतेची सेव, हाच प्रयत्न मी केलेला आहे. पक्ष काम करणाऱ्याला संधी देत असतो, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा संधी तसेच उमेदवारी मिळेल याची खात्री आहे. कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल, असं सुरेश भोळे म्हणालेत.

पक्षांतर्गत बंडखोरीवर काय म्हणाले?

जळगाव जिल्ह्यात पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळतेय. पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी केली जात आहे. यावरही सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्याने मागणं आणि इच्छा ठेवणं यात काही गैर नाही. त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला मागण्याचा अधिकार आहे. पक्षाने मला जर उद्या थांब सांगितलं तर मी थांबेल आणि पक्ष जो निर्णय घेईल. त्यानुसार त्या उमेदवाराचा मी काम करेल. पक्ष सांगेल त्यानुसार त्याचं काम केलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे, असंही सुरेश भोळे म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.