Video: ‘अहो, दाखवा एखादा हिसका, दाखवा एखादा इंगा!’ खडसे म्हणतात, ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे…’

| Updated on: Apr 15, 2022 | 2:03 PM

खडसेंनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांना दिलेला सल्लाही चर्चेचा विषय ठरतोय. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

Video: अहो, दाखवा एखादा हिसका, दाखवा एखादा इंगा! खडसे म्हणतात, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे...
पाहा व्हिडीओ - एकनाथ खडसेंनी नेमकं काय म्हटलं?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जळगाव : जळगावात शरद पवारांच्या (Sharad Pawar in Jalgaon) दौऱ्यादरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, भाजपकडून सुरु असलेलं राजकारण, या सगळ्यावर एकनाथ खडसेंनी निशाणा साधला. राज्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी खडसेंनी भाजपवर केला. दरम्यान, यावेळी खडसेंनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांना दिलेला सल्लाही चर्चेचा विषय ठरतोय. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी सरकारलाही याबाबत विनंती करणार असल्याचं म्हटलंय.

राज्यात सातत्यानं भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशातच एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

नेमकं काय म्हणाले?

जयंत रावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधेभोळे आहात. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका.. दाखवा एकदा इंगा… शेकडो प्रकरण ह्यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वी टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती.
जे सत्य आहे ते करा…
पण जे त्यांनी केलं आहे ते त्यांना भोगायला लावा..
हे काय चाललंय..
देशमुखांच्या घरावर शंभर शंभर धाडी पडतात..
व्यवहार किती कोटी रुपयांचा..कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप करता…काय कोटी रुपयांचं..
ते म्हणतात अरे तूम तो जेल मे जाने वाले है… अरे हम जेल जाएंगे तो जाएंगे.. हम डुबेंगे तो सनम तुमको भी लेकर डुबेंगे
सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत राहता..
सरकारलाही विनंती करतोय.. की सत्य आहे, ते बाहेर आणलं पाहिजे.. पवार साहेबांनाही मी ही विनंती करणार.

पाहा एकनाथ खडसेंचा सभेतील व्हिडीओ :

दरम्यान, यावेळी एकनाथ खडसे यांनी जळगावात शरद पवार यांचं स्वागतही केलं. तसंच त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, असंही म्हटलंय. यावेळी एकनाथ खडसे यांनी बारामतीचं कौतुकही केलं. खडसेंनी अनेकदा आपण बारामतीत गेल्याचं म्हटलंय. तिथलं काम पाहिल्यांचं म्हटलंय. शेतीतलं चांगलं काम पाहायचं असेल तर ते बारामतीत पाहायला मिळतं, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलंय.

इतर राजकीय बातम्या :

राऊतांचा फोटो समोर आला अन् खडसेंना बच्चनचं गाणं आठवलं, सोमय्या काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या ‘त्या’ भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा

Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका