गुरांसाठी चारा आणायला गेला, माघारी त्याचा मृतदेह आला, जळगावमधील शेतकरी पुत्रासोबत दुर्देवी घटना

Jalgaon News | महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. सातवीमध्ये शिकणारा शेतकरी पुत्राचा दुर्देवी झाला आहे. गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या मुलाचा मृतदेह माघारी आल्याने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

गुरांसाठी चारा आणायला गेला, माघारी त्याचा मृतदेह आला, जळगावमधील शेतकरी पुत्रासोबत दुर्देवी घटना
Bailgadi
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 9:55 PM

किशोर पाटील, जळगाव | महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या शेतकरी पुत्राचा मृत्यू झाला आहे. गुरांसाठी शेतातून चारा घेवून येत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. जळगावमधील वाकडी म्हसावदमध्ये ही घटना घडली. गौरव आनंदा पाटील (वय १३, रा. मु. वाकडी, पो. म्हसावद, ता. जळगाव) असं मृत मुलाचं नाव आहे. चारा आणायला गेल्यावर नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

नेमकं काय घडलं?

गौरव पाटील हा सोमवारी शेतात बैलगाडी घेऊन चारा घेण्यासाठी गेला होता. चारा घेऊन शेतातून पुन्हा घराकडे परतत असताना अचानक शेताच्या बांधावर चढून बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडीखाली गौरव दबला जाऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात दास्तावलेले बैल पळून जाण्याच्या प्रयत्नात बैलगाडी मध्ये अडकवलेला विळा हा गौरवच्या कपाळात घुसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणाता रक्तस्त्राव झाला होता. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.

आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उचलून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी आणलं होतं. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान, मयत गौरव यांच्या पश्चात आई, वडील, काका, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. त्याचा परिवार शेतीकाम करून उदरनिर्वाह करतो. गौरव पाटील हा थेपडे शाळेत सातवीमध्ये शिकत होता. दरम्यान, गौरवच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.  एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.