जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल

Girish Mahajan on Uddhav Thackeray : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा बोलकाना महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जिंकूनही उद्धव ठाकरे रडीचा डाव का खेळताहेत?; भाजप नेत्याचा थेट सवाल
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 6:25 PM

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आता तुम्ही विजयी झालेला आहात. मग आता तुम्ही उत्सव साजरे करा. आनंद साजरा करा. उलट रडत का बसताहेत? असा रडीचा डाव आता खेळू नका. हा शेवटी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे ते काय कारवाई करणार ते मला माहित नाही, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर आता बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. यावर बोलताना गिरीश महाजनांनी टोला लगावला आहे. जळगावात महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे.

निवडणूक काळाप पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहेय यावर असे आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. पराभव समोर दिसला की आधीच असे कारण शोधले जातात. मतपेटी ईव्हीएम हा तर त्यांचा विषय ठरलेला आहे. मात्र आता त्यांचा जागा जास्त आल्या म्हणून हा विषय आता सध्या बंद झाला आहे. मी सुद्धा तो व्हीडिओ बघितला आहे. मात्र पैसे हे मतदानासाठी दिले की इतर कुठल्या प्रक्रियेसाठी दिले हा तपासाचा भाग आहे. त्यांनी जर तक्रार दिली तर निवडणूक आयोग चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल, असं महाजन म्हणाले.

जयंत पाटलांना प्रत्युत्तर

जयंत पाटील आणि देश काही संबंध आहे का? जयंत पाटील यांनी राज्यात त्यांच्या पक्षाचे काम करावं. नरेंद्र मोदीजींवर भाजपचा आणि लोकांचा विश्वास आहे. 240 जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत.मग तुम्ही का देशाची चिंता करता आहात? तसं असतं तर लोकांनी आम्हाला मताधिक्य दिलं नसतं. एवढ्या जागा निवडून दिल्या नसत्या, असं गिरीश महाजन म्हणाले.

जरांगेंच्या विधानावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील काहीही म्हणाले तरी मला आता त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांचं म्हणणं काहीही असलं तरी मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेच्या भूमिकेवर भाष्य केलंय.

स्मिताताई वाघ या पहिल्यांदा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा लोकांशी संपर्क तोडू नका. खासदार झाले म्हणून आता लोकांचा संपर्क तोडू नका, असा सल्ला मी त्यांना दिलेला आहे.स्मिता ताई यांनी जास्तीत जास्त वेळ हा मतदारसंघासाठी लोकांचे काम करण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी द्यावा हे मी त्यांना सांगितलंय, असंही गिरीश महाजन म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.