तरुणाने नाही, तरुणीने तरुणावर केला चाकू हल्ला; तरुणावर एकावर एक वार करतच होती, आणि तो झेलत होता वार…
सोशल मीडियावर ही घटना वाऱ्यासारखी पसरत गेल्याने या घटनेची जळगाव जिल्ह्यासह जोरदार चर्चा झाली मात्र पोलिसांना मात्र या घटनेबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं दिसून आले आहे.
जळगाव : सोशल मीडियामुळे सध्या कोणती घटना कधी जग जाहीर होईल हे सांगता येणार नाही. जळगाव जिल्ह्यातील अशी एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. शहराती एका चौकामध्ये युवक युवतीचे वाद सुरु आहेत, हे वाद टोकाला गेल्यानंतर मात्र सर्रासपणे तरुणांकडून महिलांवर हल्ला होत असतो मात्र जळगावमध्ये यावेळी चक्क तरुणीनेच युवकावर आपल्याकडे असलेल्या चाकून वार करत त्याला जखमी केले आहे. एवढेच नाही तर तो जखमी झाल्यानंतरही तरुणीकडून त्याच्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात होता. हेच चित्र त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
जळगावच्या अजिंठा चौक परिसरात रविवारी भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करून एका तरुणावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यामध्ये तरुणाला छातीजवळ चाकू लागल्याने तो जखमी झाला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला असून पोलीस ठाण्यात मात्र या घटनेची नोंद झाली नाही.
सकाळी 11 ते 1 वाजण्याच्या दरम्यानची ही घटना घडली आहे. शहरातील एका चौकामध्ये एक तरुण आणि तरुणीचा भर चौकात गोंधळ सुरु होता. यावेळी त्या दोघांमधील वाद वाढत गेल्यानंतर काही वेळाने तरुणीने आपल्याकडचा छोटा चाकू काढून तरुणाच्या छातीत वार केला.
तरुणीने तरुणावर वार करताच चाकूच्या पुढील भागाचे टोक युवकाच्या छातीत घुसले त्यामुळे तरुणाच्या छातीतून रक्ताची धार लागली होती. तरुण जखमी झाल्यानंतर आणि त्याच्या छातीत रक्त वाहू लागले तरीही तरुणी त्याला चाकू मारण्याचा प्रयत्न करीत होती.
यावेळी त्या दोघींचे वाद विकोपाला गेल्यामुळे हा हल्ला झाला होता. त्यावेळी तरुणी तरुणावर पुन्हा पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करत होती. तर त्याच वेळी तो तरुण मात्र हातातून चाकू हिसकवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरु होता.ॉ
याबाबतचा या वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर ही घटना वाऱ्यासारखी पसरत गेल्याने या घटनेची जळगाव जिल्ह्यासह जोरदार चर्चा झाली मात्र पोलिसांना मात्र या घटनेबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं दिसून आले आहे. जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.