“कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही”;राष्ट्रवादीच्या टीकेला शिंदे गटानं एकाच वाक्यात उत्तर दिलं

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी असा सामना रंगाला आहे. त्यावरूनच जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताच कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे प्रत्युत्तर देत जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले.

कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही;राष्ट्रवादीच्या टीकेला शिंदे गटानं एकाच वाक्यात उत्तर दिलं
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 2:45 PM

जळगाव : राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर ठाकरे व महाविकास आघाडीकडून वारंवार टीका केली जात आहे. त्यातच पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात यश मिळणार नाही अशी टीका ठाकरे गट, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.

त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांवर महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे.

त्यामुळे आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आगामी काळात शिवसेनेला चांगले यश मिळणार नाही अशी टीका करण्यात आली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना आगामी काळात शिंदे गटाचे नामोनिशान मिटणार असल्याची टीका करण्यात आली होती.

त्या टीकेला प्रत्युत्तर देत आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचे सांगत जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना त्यांना सांगितले की, जर जयंत पाटील असंही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही.

त्यामुळे रामदास आठवले यांचे पण आमदार निवडून येतात त्यामुळे जयंत पाटील यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.