जळगावात 80 वर्षाच्या वृद्धेची गळा चिरून हत्या ; घटनास्थळी विळा सापडला; तपासासाठी पोलीस पथके रवाना

पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच राहत होत्या. सायंकाळी घरातील दिवा का लागला नाही याची चौकशी त्यांच्या नातेवाईंकाकडे करण्यात आली.

जळगावात 80 वर्षाच्या वृद्धेची गळा चिरून हत्या ; घटनास्थळी विळा सापडला; तपासासाठी पोलीस पथके रवाना
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 10:46 PM

जळगावः पाचोरा तालुक्यातील पिंप्री बु. (Pimpri Bu.) येथे ८० वर्षीय वृध्द महिलेचा (Older women murder) अज्ञात व्यक्तीने गळ्यावर विळ्याने वार करुन खुन केल्याने घटना घडली आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलीस (Pachora Police) स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच राहत होत्या. सायंकाळी घरातील दिवा का लागला नाही याची चौकशी त्यांच्या नातेवाईंकाकडे करण्यात आली.

त्यानंतर तेजसबाईंचे नातेवाईक घरात येऊन बघितल्यानंतर त्यांचा गळा चिरुन हत्या केल्याचे त्यांना समजले. या घटनेची माहिती नगरदेवळ आऊटपोस्टला कळविण्यात आल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हत्या नेमकी कशासाठी

या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करत हत्या करुन विळा घटनस्थळी टाकून हत्या आरोपींनी पोबारा केला आहे. हा खुन नेमका कशासाठी करण्यात आला आहे, त्या घटनेची माहिती अजून कुणालाच समजली नाही.

तपासचक्रे वेगाने

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील, ठसे तज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक हे सारे दाखल झाले असून तपासचक्र वेगाने फिरू लागली आहेत.

संशयितांचे धागेदोरे मिळाले ?

तपास कामी काही पथक तयार करून तपास वेगाने सुरू झाला असून संशयितांचे धागेदोरे मिळाले असून लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना निश्चित यश येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.