Jalgaon | ऑडिटर्स साहेब चक्क चड्डी-बनियनवर, जळगावातल्या बोदवड ग्रामपंचायतीतल्या प्रकाराची राज्यात चर्चा
14 वा वित्त आणि 15 वित्त आयोगाचे लेखीपरीक्षणासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात आले होते. अधिकाऱ्यांनी गावामधील एका घरात हे परिक्षण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी चड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे आणि हा विषय संपूर्ण जिल्हात चर्चेचा बनला आहे.
जळगाव : जळगावात (Jalgaon) नाशिकच्या अधिकाऱ्यांनी चक्क वित्त आयोगाचे लेखीपरीक्षण चड्डी बनियानवर केल्याने एकच खळबळ उडालीयं. बोदवड येथे ही धक्कादायक घटना घडलीयं. बोदवड तालुक्यातील अधिकाऱ्यांचा चड्डी बनियानवरील फोटो आता सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होताना दिसतोयं. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांच्या (Officer) चड्डी बनियानवर जिल्हाभरात चर्चा रंगताना दिसते आहे. बोदवड तालुक्यात ग्रामपंचायतचे लेखी परीक्षण अधिकाऱ्यांनी चक्क चड्डी बनियांवर केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायत 14 ,15 वित्त आयोगाच्या लेखीपरीक्षण दरम्यान हा प्रकार घडलायं.
वित्त आयोगाचे लेखीपरीक्षण चक्क चड्डी बनियांवर
14 वा वित्त आणि 15 वित्त आयोगाचे लेखीपरीक्षणासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात आले होते. अधिकाऱ्यांनी गावामधील एका घरात हे परिक्षण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी चड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे आणि हा विषय संपूर्ण जिल्हात चर्चेचा बनला आहे. परंतू या अधिकाऱ्यांनी चड्डी बनियानवर लेखी परिक्षण नेमके का केले हे अजून कळू शकले नाहीयं.
चड्डी बनियांवरच लेखीपरीक्षण केल्याने जिल्हात एकच खळबळ
गावातील एका घरात या अधिकाऱ्यांनी चड्डी बनियानवरच लेखीपरीक्षण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाशिकच्या या अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा चड्डी बनियानची जिल्ह्यात रंगत आहे. बोदवड तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायत 14 ,15 वित्त आयोगाच्या लेखीपरीक्षण करण्यासाठी हे तीन अधिकारी नाशिकवरून बोदवडच्या एनगावात दाखल झाले होते. दरम्यान हा प्रकार घडलायं.