Jalgaon Gold : जळगावच्या सराफा बाजारात सोने महागले, तर चांदीने घेतली भरारी, काय आहेत किंमती
Jalgaon Sarafa Bazaar : ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीने महागाईची वर्दी दिली. सुवर्णनगरीत मौल्यवान धातूत वाढ झाली. बाजारात सोने महागले, तर चांदीने भरारी घेतली. ग्राहकांच्या खिशावर त्यामुळे भार येणार आहे.
सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या किंमतींनी भरारी घेतली आहे. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी मौल्यवान धातूच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात बुधवारी वाढ झाली. यात चांदीमध्ये एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार रुपये प्रतिकिलोवर, तर सोन्यात ८०० रुपयांची वाढ होऊन ते ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
सीमा शुल्कात कपातीचा परिणाम
केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा झाल्यापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामध्ये सोन्याचे भाव कमी- कमी होत जाऊन ३० जुलैपर्यंत सोने ६९ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर बुधवारी त्यात ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ जुलैनंतर सोने पुन्हा एकदा ७० हजार रुपयांवर पोहचले.
मंगळवारी ८२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात बुधवारी थेट एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी तर चांदीचे दरात १ हजार ५०० रुपयांनी वाढ सोन्याचे दर प्रति तोळा ७० हजार रुपयांवर आले तर चांदीचे दर प्रति किलो ८४ हजारांवर पोहोचले.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,309, 23 कॅरेट 69,031, 22 कॅरेट सोने 63,487 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,982 रुपये, 14 कॅरेट सोने 40,546 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 82,974 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.