जळगावः जळगावमध्ये (Jalgaon) शिवसेनेबद्दल (Shivsena) आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) व्हायरल करणाऱ्या व्यक्तीस शिवसैनिकांनी भर चौकात चोप दिल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला सर्वांसमोर हात जोडून माफी मागायला लावली. त्याचे शुटींगही केले. या प्रकाराने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, जळगावमध्ये एका अज्ञाताकडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होते. शिवसैनिकांपर्यंत हा मेसेज पोहचला. त्यांनी ही पोस्ट कोणाच्या मोबाइलवरून पहिल्यांदा पाठवण्यात आली आहे, याचा शोध घेतला. त्या संबंधित व्यक्तीला जाऊन गाठण्यात आले. भरचौकात आणून या व्यक्तीला चोप देण्यात आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनीही त्यांनाही तंबी देत दूर रहायला सांगितले. साधरणतः अर्धातास हा प्रकार सुरू होता. मात्र, केवळ शिवसेनेची सत्ता आहे म्हणून कायदा हातात घेणार का, सोशल मीडियावर लिहिले म्हणून सतत मारहाण करणार का, असा सवाल यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी मारहाण झाल्यानंतर उपस्थित केला.
कोण केली पोस्ट व्हायरल?
शिवसैनिकांनी ज्या व्यक्तीच्या मोबाइलवरून पोस्ट व्हायरल झाली आहे, त्याला गाठले. त्याने सुरुवातीलाच हात जोडून माफी मागितली. मात्र, शिवसैनिकांचा राग काही शांत झाला नाही. त्यांनी संबंधितांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. काही जणांनी या व्यक्तीच्या डोक्यात पाठीमागून फटके दिले. त्यामुळे अनेकांनी मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. संबंधित व्यक्ती म्हणाला की, मोबाइल माझ्या लहान मुलाच्या हातात होता. त्याने कार्टून असल्याचे वाटून दुसऱ्याला तो मेसेज पाठवला. त्याच्या वतीने मी माफी मागत म्हणत हात जोडले.
मुख्यमंत्र्यांची माफी मागायला लावली
शिवसैनिकांचा राग माफी मागितल्यानंतरही शांत झाला नाही. त्यांनी त्या व्यक्तीला पुन्हा दोन-चार फटके दिले. काही जणांनी मोबाइलसमोर माफी मागायला सांगितले. दुसऱ्याने मोबाइलवर शुटींग सुरू केले. संबंधित व्यक्तीने माफी मागायला सुरुवात केली. त्यावेळीस त्या व्यक्तीला इतरांनी कशी आणि कोणाची माफी मागायची हे सांगितले. त्यात मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली. त्यानंतर या व्हायरल पोस्ट प्रकरणावर पडदा पडला.
इतर बातम्याः