जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा; मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली नसतानाही दाम्पत्याला बेदम मारहाण
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा करत आणि हातात कायदा घेत दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुठलिही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली नव्हती. मात्र, तरीही शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेचे मंगळसूत्रही गहाळ झाल्याचे समोर आले आहे.
जळगावः सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा करत आणि हातात कायदा घेत दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर (Shivsena) अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुठलिही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली नव्हती. मात्र, तरीही शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. या प्रकरणी जळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमध्ये शिवसैनिकांनी कायदा हातात घेण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वीही शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून एका ज्येष्ठास भरचौकात चोप दिला होता. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ केला होता. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
शिवसैनिकांनी केलेल्या मारहाण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहिल्यास सुरुवातील काही लोकांनी या तरुणाला घेराव घातल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर जमलेला सर्व घोळका त्या तरुणावर तुटून पडत आहे. आणि त्याला तुफान मारहाण करताना दिसत आहे. मात्र, एवढ्या गर्दीतही एक महिला पुढे येत या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्याला कडाडून मिठी मारत गर्दीतून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या महिलेलाही मार लागल्याचे या व्हिडिओत दिसत आहे, पण बेभान झालेल्या गर्दीला याचे भान उरलेले नाही. या धक्कादायक प्रकाराने जळगावसह राज्यात खळबळ माजली आहे. या महिलेला या गर्दीत झालेली मारहाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी असल्याचे समोर आले आहे.
जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांकडून चोप pic.twitter.com/pUSMUvnuv8
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2022
आठ दिवसांत दोन घटना
जळगावमध्ये शिवसैनिकांनी कायदा हातात घेण्याच्या आठ दिवसांत दोन घटना घडल्या आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली म्हणून शिवसैनिकांनी एका ज्येष्ठ व्यक्तीस मारहाण केली होती. शिवसैनिकांनी ज्या व्यक्तीच्या मोबाइलवरून पोस्ट व्हायरल झाली आहे, त्याला गाठले. त्याने सुरुवातीलाच हात जोडून माफी मागितली. मात्र, शिवसैनिकांचा राग काही शांत झाला नाही. त्यांनी संबंधितांच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. काही जणांनी या व्यक्तीच्या डोक्यात पाठीमागून फटके दिले. त्यामुळे अनेकांनी मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. संबंधित व्यक्ती म्हणाला की, मोबाइल माझ्या लहान मुलाच्या हातात होता. त्याने कार्टून असल्याचे वाटून दुसऱ्याला तो मेसेज पाठवला. त्याच्या वतीने मी माफी मागत म्हणत हात जोडले. त्यानंतरही शिवसैनिकांनी या व्यक्तीला मारहाण केली.
इतर बातम्याः