53 आमदारांच्या सह्याचं पत्र आजही शरद पवारांच्या कपाटात…; कुणी केलं विधान?

NCP Leader Anil Patil on Sharad Pawar Dhananjay Munde : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने जळगावमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचं नाव घेत त्यांनी मोठं विधान केलं आहे. नेमकं काय वक्तव्य केलं? वाचा सविस्तर...

53 आमदारांच्या सह्याचं पत्र आजही शरद पवारांच्या कपाटात...; कुणी केलं विधान?
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 7:39 PM

भाजपला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका काय होती, यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे.53 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र आजही शरद पवार साहेबांच्या कपाटात असेल. हे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य खरं आहे. 53 आमदार यांच्यामधला मी सुद्धा एक आमदार आहे. 2019 मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत बसायचं अशा आम्हा आमदारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. ते सह्या असलेलं पात्र आहे. एक दिवस नक्की सर्वांना बघायला मिळेल, असं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

फाईल्स, कपाट अन् चाव्या…

आमदारांच्या फाईली या मोदी साहेबांच्या कपाटात आहे, असं अजब वक्तव्य शरद पवारसाहेबांनी केलं. शरद पवार साहेबांना महाराष्ट्राच्या वतीने विनंती असणार आहे. जर त्या चाव्या तुमच्याकडे असतील तर लवकरात लवकर ते कपाट उघडायला लावा. आमदारांच्या फायद्या असणे इतपत एकही दुष्कृत्य एकही आमदारांकडून तसेच मंत्र्यांच्या माध्यमातून झालेलं नाही. त्यामुळे जर का ते कपाट तुम्हाला माहिती असेल. ते कपाट लवकरात लवकर उघडायला तरी सांगावं , चाव्या तरी द्या, असा टोला आमदारांच्या फायद्याच्या बाबतीत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अनिल पाटील यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

निधीच्या बाबतीत अजित दादांनी जे वक्तव्य केलं. ती वस्तुस्थिती आहे. काम करणारा व्यक्ती हा निधी वाटण्यासाठी. मतदारांकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून आशीर्वाद म्हणून त्या स्वरूपाची अपेक्षा करतो. निधी वाटप जो करू शकतो, तोच हे वक्तव्य करू शकतो, असं ही अनिल पाटील म्हणालेत.

अनिल पाटलांचा शरद पवारांना टोला

आजपर्यंत विकासाच्या आधारावर अजित दादांनी मतं मागितलेली आहेत. सहानुभूतीच्या प्रयत्नातून आजपर्यंत कधीही मत मागितलेली नाहीत. त्यामुळे अजितदादा ते देतात त्या आशीर्वादाच्या स्वरूपात परत सुद्धा मागतात. त्यामुळे या गोष्टींना कुठलंही तथ्य नाही. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता. केवळ धादांत खोटं बोलायचं वेगळ्या दिशेला प्रचाराचा मुद्दा न्यायचा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. या गोष्टी आपल्याला आजच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मंत्री अनिल पाटील यांचा शरद पवार यांना टोला लगावला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.