उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाआधी जळगावात घडामोडींना वेग; ‘त्या’ बॅनरची चर्चाच चर्चा
Unmesh Patil inter in Shivseana Uddhav Tackeray Group Today : उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाआधी जळगावात काय घडतंय? 'त्या' बॅनरची चर्चाच चर्चा कुणी लावले ते बॅनर? बॅनरवर नेमकं काय? उन्मेश पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश कधी? वाचा सविस्तर.....
ऐन निवडणूक काळात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांना ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलंय. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाआधी जळगावात घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटात पक्षप्रवेशापूर्वीच जळगावात करण पवार यांचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं पोस्टर व्हायरल झालं आहे.
उन्मेश पाटील आज आज मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यासह करण पवार यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेश पाटील जरी ठाकरे गटात प्रवेश करणार असले तरी निवडणुकीची उमेदवारी मात्र करण पवार यांना मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे करण पवार हेच जळगाव लोकसभा जिंकतील, असे पोस्टर जळगावमध्ये व्हायरल झाले आहेत.
‘ते’ पोस्टर व्हायरल
करण पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती आहे. कालपासूनच त्यांच्या नावाचे प्रचाराचे बॅनर व्हायरल झाले आहेत. पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह उन्मेश पाटील यांचाही फोटो झळकला आहे. वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर करण पवार यांच्यासह उन्मेश पाटील यांचं ठाकरे गटाच्या वतीने स्वागत केलं जात आहे.
उन्मेश पाटील यांचा पक्षप्रवेश कधी?
उन्मेश पाटील हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. दुपारी 12 वाजता उन्मेश पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक नेते आणि कार्यकर्तेदेखील ठाकरे गटात प्रवेश करतील. यात करण पवार यांचं नाव आहे. करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
उन्मेश पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतील. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उन्मेश पाटील ठाकरे गटात जातायेत, अशी चर्चा असेल तर बोलणं उचित नाही. मी बातम्या पाहू शकत नाही मी माझ्या प्रचारात आहे. मी यावर टिपण्या पाहू शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.