6 वर्षीय चिमुकलीला शेतात नेऊन बलात्कार केला अन् मग हत्या; जळगावातील घटनेने महाराष्ट्र हादरला
Jalgoan Child Rape Case : जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या नराधमाने क्रुरतेची मर्यादा ओलांडली. त्याने या चिमुकल्या जीवाची हत्या केली आहे. या घटनेने परिसर हळहळला आहे. वाचा सविस्तर...
जळगावमध्ये मानतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर बलात्कार केल्यानंतर या चिमुकलीची हत्या देखील करण्यात आली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीला खाऊचं अमिष दाखवून शेतात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र घडला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून या नराधमाने चिमुकलीची हत्या केली आहे. जळगावातल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावमध्ये काळीज हेलावणारी घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या सहा वर्षांच्या चिमुकलीला तुला खाऊ देतो आणि खेळायला मोबाईल देतो, असं म्हणत नराधमाने चिमुकलीला आपल्यासोबत घेतलं. फोन आणि खाऊचं आमिष दाखवून आरोपी अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर एका शेतात त्याने तिच्यावर अत्याचार केला. मग ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून या चिमुकल्या जीवाची हत्या केली.
चिमुकल्या जीवाची हत्या जळगावसह महाराष्ट्र हादरला…
अवघा सहा वर्षांचा जीव तो… आपल्या शरिराबद्दलची जागरूकता तर दूरची गोष्ट पण समोरची व्यक्ती आपल्यासोबत काय करतेय हे देखील कळण्याचं तिचं वय नव्हतं. खेळण्या- बागडण्याच्या वयात या चिमुकलीला नको त्या घटनेला सामोरं जावं लागलं. काही कळण्याच्या आतच तिच्यासोबत अत्याचार झाला. पण तो नराधम इतक्यावरही थांबला नाही. ही घटना कुणाला कळू नये, म्हणून स्वत:च्या बचावासाठी त्याने या चिमुकलीची हत्या केली अन् या सगळ्यानंतर स्वत: मात्र पळून गेला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या घटनेचे महाराष्ट्रभरात परिणाम दिसत आहेत. या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
जळगावमधल्या या घटनेवर जामनेर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध अपहरणाचा कलम तसेच खुनाच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेसाठी तब्बल दहा पथक जवळपासच्या जंगलासह विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ही पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.