जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा…; निवडणुकीआधी गिरीश महाजनांचं कुणाला आव्हान?

Girish Mahajan Jamner Sabha : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी निवडणुकीत पाडून दाखवा, असं ओपन चॅलेंज दिलं आहे. गिरीश महाजन काय म्हणाले? एकनाथ खडसेंबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी....

जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा...; निवडणुकीआधी गिरीश महाजनांचं कुणाला आव्हान?
गिरीश महाजन, मंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 9:29 AM

जळगावच्या जामनेरमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. मला पाडायचा असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा… असं ओपन चॅलेज मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांना दिलं. जामनेरमधील भाजपच्या बैठकीत जाहीर भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान दिलं आहे. तुमचं बोदवड महिना महिना पाण्यावाचून तडफडतंय. आधी ती पाणीटंचाई सोडवा, मग विकासाचं बोला, असं महाजनांनी म्हटलं आहे.

ईडी अन् सीडीवर भाष्य

2020 ला जेव्हा एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हा प्रवेश करताना केलेल्या भाषणात आता माझ्या मागे ईडी लावतील. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं खडसेंनी तेव्हा म्हटलं होतं. त्यावरही गिरीश महाजनांनी भाष्य केलं आहे. काय फालतू सारखं पांचटसारखं नेहमी तेच तेच बोलता. आपण किती खालच्या स्थानाला जाऊन बोलतो आहे किती असतील बोलतो आहे महिला टीव्ही बघतात. त्याला म्हटलं त्याला नार्कोटेस करून घ्या. इंजेक्शन दिलं का माणूस खरं काय खोटं काय ते बोलतो त्याला इंजेक्शन द्या आणि विचारात फरदापुर चा खरं काय खोटं काय. तुमची नाही माझी पण नार्को टेस्ट नार्को टेस्ट करा. आहात का तयार? म्हणे माझ्याकडे सीडी आहे सीडी आहे कुठे आहे सीडी…?, असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं आहे.

एकनाथ खडसेंवर घणाघात

स्वतःची ग्रामपंचायतही जिंकू न शकणारे खडसे यांनी जामनेरच्या विकासावर बोलू नये. मी मी म्हणणारे एकनाथ खडसे यांचं आता काय राहिलं आहे? त्यांच्याकडे जिल्हा बँक राहिले नाही जिल्हा दूध संघ राहिला नाही. आमचे मंगेश चव्हाण मुक्ताईनगरला गेले आणि मंदा खडसे वहिनी यांना निवडणुकीत हरवलं. जेव्हा आपण अहंकार करतो, गर्व करतो. सर्व माझ्यामुळे माझ्यामुळे असं करतो तेव्हा कसं गर्व हरण होतं. हे आपल्या लक्षात आले असेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

हा जामनेर तालुका आहे काही भाषण करा इथे तुमची डाळ शिजणार नाही… विकास कामांची स्पर्धा करा तुम्ही मंत्री असताना काय केला आणि मी माझ्या मतदारसंघात काय विकास काम केले. ते पाहा…. तुम्ही काय कारनामे केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं.. त्यांचा जावई दोन वर्ष जेलमध्ये जाऊन बसला. तुम्ही मला कधी दारू पिताना पाहिला आहे का? सांगितलं तर कोणीही असेल, असं त्यांनी म्हटलं.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.