आम्ही नवरदेववाले, ते नवरीवाले आता…; गुलाबराव पाटलांच्या गावरान भाषेतील वक्तव्याची जोरदार चर्चा
Gulabrao Patil on Loksabha Election 2024 : गुलाबराव पाटील यांचं गावरान शैलीत भाष्य; भाजपसमोर अपेक्षा 'ही' मांडली, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. जळगावात बोलताना नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
जळगाव जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गटाच्या नाराजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मागच्या लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभेत आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते.आम्ही नवरदेव वाले आहोत. ते नवरीवाले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा आहे. गेल्या काळातील केलेल्या चुकांची पुढच्या काळात भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये. अशी अपेक्षा आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मागच्या काळात तसेच त्याच्या मागच्या काळात आम्ही मोदीजींचं काम केलं होतं. 1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार आम्ही निवडून दिला आहे. यावेळी सुद्धा आम्ही कुठल्या गोष्टीची कमतरता करणार नाही. आम्ही नवरदेव वाले आहोत ते नवरीवाले आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी आम्हाला नवरदेव वाला समजून मदत करावी हीच अपेक्षा आहे. असंरी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
“मागच्या चुका…”
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिंदे गटात नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काळात भाजपकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या पुढच्या काळात घडणार नाही. असं आश्वासन राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत वरिष्ठांनी दिलं आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
‘त्या’ बैठकीत काय झालं?
मागच्या वेळी साहजिकच काही गोष्टी घडल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र लेव्हलला बैठक झालेली आहे. मागच्या वेळी लोकसभेत भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभेत आमच्या समोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले होते. तरी पुनरावृत्ती पुढच्या काळामध्ये होऊ नये, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
आम्ही जर मन लावून काम करतो आहे. तर तुम्ही सुद्धा आम्हाला त्यावेळी मदत केली पाहिजे. ही अपेक्षा ठेवणे काही चुकीचे नाही. मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत. त्या पुढच्या काळात घडणार नाही. अशा आश्वासन आम्हाला राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत दिलेलं आहे, असं पाटील यांनी सांगितलं.