मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?

Sanjay Raut on Uddhav Thacekray Jalgoan Sabha : मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचं कौतुक; जळगावच्या जाहीर सभेत संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते; संजय राऊत यांनी कुणाचं कौतुक केलं?
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 3:35 PM

जळगाव | 10 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्याचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील दोन नेत्यांचं कौतुक केलं आहे. मुंबईत बसून ते देशातील घडामोडींवर लक्ष ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे… आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही, आमचं राजकारण मुंबईत मातोश्रीवरूनच होईल, असं संजय राऊत म्हणाले.

आजच्या या सभेला गर्दी होईल की नाही, असं वाटत होतं. अरे चार टकले गेले म्हणजे शिवसेना गेली नाही. शिवसेना समोर आहे. उद्धव ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी चार टकल्यांनी ताकद लावली. पण आम्ही आलो आणि उद्धवजी आले आणि त्यांनी जळगाव जिंकलं. जळगावकरांचं उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम कायम आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाषणाला सुरुवात केली.

आजच्या सभेने चार टकल्यांना धडकी भरली असेल उद्या ते बाहेर पडणार नाहीत. वेळप्रसंगी उद्धवजी देशाचे नेतृत्व करतील. आजचा हा शुभसंकेत आहे. आज ते मुख्यमंत्री नसले तरी नेतृत्व करत आहे. सत्ता येते जाते पण आमच्यात सत्ता आणण्याची धमक आहे. चार आमदार गेले तर 10 निवडून आणू. घराघरात आणि मनामनात शिवसेना आहे. सोडून गेले ते गद्दार आहेत. ते अजूनही जनतेत जाऊ शकत नाही. त्यांच्या मनात चपला आणि जोडे मारतील अशी भीती वाटत आहे. जळगावचे लोक उद्धवजींच्या पाठीशी आहेत. येत्या काळातही जनता आपल्या मागे उभी राहील आणि या गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. इथं सांडेश्वराचं मंदिर आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. शिवाजी महाराजांची तलवार होताना ती जाताना शिवसेनेकडे देऊन गेले, असं संजय राऊत म्हणाले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.