म्हणून मोदींना संविधान बदलता आलं नाही; जळगावच्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar on PM Narendra Modi : जळगावमध्ये शरद पवार यांची सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाष्य केलंय. शरद पवार यांनी जळगावच्या भाषणात काय म्हटलं? वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. तेव्हा विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. भाजपला बहुमत मिळालं तर हे संविधान बदलतील, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. यावर आजच्या जळगावच्या सभेत शरद पवार बोलले आहेत. शरद पवार यांनी घटना बदलण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला एक जागा होती आणि राष्ट्रवादीला जागा होती. यावेळी 48 पैकी 31 जागा तुम्ही निवडून दिल्या. त्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचे पाप मोदींना करता आलं नाही, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली… त्यासा ठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाच्या आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही, असं शरद पवार म्हणालेत.
चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार या दोघांना सोबत घेऊन केंद्रात सरकार स्थापन केले. काय केलं सत्ता .कोणत्या निर्णय घेतले. काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱ्यांची काय आहे देशातल्या तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे. एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याच्या मालाला किंमत देत नाही… जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादननुसार नाव मिळत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार या दोघांना सोबत घेऊन केंद्रात सरकार स्थापन केले. काय केलं सत्ता .कोणत्या निर्णय घेतले. काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱ्यांची काय आहे देशातल्या तरुणांची आणि भगिनींची काय अवस्था आहे. एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याच्या मालाला किंमत देत नाही… जो माल पिकवतो त्याला त्याच्या उत्पादननुसार नाव मिळत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत