ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटलांना स्मिता वाघ यांचा टोला; म्हणाल्या, प्रत्येकाने…

Smita Wagh on Unmesh Patil Inter in Shivsena Uddhav Thackeray Group Today : उन्मेश पाटील यांना ठाकरे गटात प्रवेश; भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची सविस्तर प्रतिक्रिया; स्मिता पाटील यांनी काय टोला लगावला? जळगावात माध्यमांशी बोलताना त्यांनी काय म्हटलं?

ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटलांना स्मिता वाघ यांचा टोला; म्हणाल्या, प्रत्येकाने...
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 3:27 PM

उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरही ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. करण पवार आणि शेकडो कार्यकर्त्यांसह उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने करण पवार यांना जळगावमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्मिता वाघ काय म्हणाल्या?

पक्षनिष्ठ हा गुण प्रत्येकामध्ये असला पाहिजे आणि तो प्रत्येकाने जोपासला पाहिजे, असं म्हणत जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या उन्मेश पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. उमेदवार करण पवार असो की उन्मेष पाटील असो ही युद्धभूमी आहे… युद्धभूमीमध्ये सर्वजण आपापलं काम करत असतो. त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करू, असं स्मिता वाघ म्हणाल्या आहेत.

“उन्मेश पाटील यांना पक्षाने भरभरून दिलं”

उन्मेश पाटील यांना एकदा आमदारकी, एकदा खासदारकी असं पक्षाने भरभरून दिलं. भाजप म्हणून भाऊ त्यांच्या पाठीशी नसते तर त्यांना आमदारांनी खासदारकी पर्यंत उन्मेश पाटील पोहोचले नसते. मनातून पक्षाचं स्थान जाणं हे एवढ्या लवकर शक्य नाही. त्यामुळे शरीराने जरी उन्मेशदादा तिकडे असले तरी मनाने मात्र ते भाजपमध्येच आहेत. पक्षात कधीही बदलाच राजकारण नव्हतं. पक्षाचे त्या त्यावेळी निर्णय घेतले जातात त्यानुसारच पक्षाने यावेळी सुद्धा तो निर्णय घेतला, असं स्मिता वाघ म्हणाल्या.

प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं त्यामुळे तो त्या पद्धतीने घेत असतो. आम्ही जन्माला भाजप झेंडा घेवून आलो आणि मरतानाही भारतीय झेंडा घेवून च जाऊ हे आमचे तत्व ठरलेला आहे. मी त्यांच्या पाठीमागे थांबले होते… मात्र तर ते थांबले नाहीत… त्यांनी त्यांचा निर्णय घेतला… मात्र जळगावची जागा भाजपच जिंकेल, असं स्मिता वाघ म्हणाल्या.

विजय हा भाजपचाच- वाघ

या जळगाव मतदारसंघात गेल्या 30 वर्षापासून खासदार हा भाजपचा होता. यावेळी सुद्धा भाजपचाच खासदार होईल, असा विश्वास आहे. तळागाळातला कार्यकर्ता हा भाजप सोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास हा जनतेसमोर आहे. जनता विकासाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.