शिंदे, अजितदादा, राज ठाकरे महायुतीत आले पण, ते…; माजी खासदाराचा भाजपवर निशाणा
Unmesh Patil on BJP and Girish Mahajan : गिरीश महाजन स्वतः ला संकटमोचक समजत असतील तर...; 'त्या' माजी खासदाराचा थेट निशाणा. शिंदे, अजितदादा, राज ठाकरे महायुतीत आले पण, ते... माजसी खासदाराने नेमकं काय म्हटलं? भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...
भाजप डोक्याचं राजकारण करत आहे. पण डोक्यात काय आहे? त्याचा विचार करा… कागदावर गणितं सोडवत आहात. मात्र हिशोब करत नाहीत.तुमच्याकडे अजित दादा पवार आले आहेत. एकनाथ शिंदे आले आहेत. अशोक चव्हाण आले आहेत. राज ठाकरे म्हणजेच मनसे आली आहे. पण ते कोणीही दिलसे. म्हणजेच मनापासून आलेले नाहीत… तुमच्याकडे डोकी आली आहेत. पण डोक्यातले विचार नाही आले. लीडर आले पण केडर नाही आले…. त्यामुळे गर्दी पेक्षा गर्दी लोक तुमच्या सोबत आहेत का? गर्दी पेक्षा त्या लोकांचं मन तुमच्यासोबत आहे का?, बे बघितलं पाहिजे, असं म्हणत माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपवर टीका
आताची भाजप ही गोपीनाथ मुंडे- प्रमोद महाजनांची भाजप राहिलेले नाही. कार्यकर्ते तुमच्या बापाचे नोकर आहेत का? पुण्य पापाचा हिशोब लोक करतील ना ते लोकांवर सोडा… माझ्यावर बोलण्यापेक्षा, मला बदनाम करण्यापेक्षा शेतकऱ्यांचां आक्रोश समजावून घ्या. मंगेश चव्हाण यांच्यावर बोलण्या एवढे ते मोठे नाहीत, असं म्हणत उन्मेश पाटील यांनी टीकास्त्र डागलं आहे.
तुम्ही जे देशाचं राजकारण केलं. बदल्याचा राजकारण केलं त्याला हे जनता कंटाळली आहे. आम्हाला त्यांच्यासारखे माळेचे मणी व्हायचे नाही. आता मूळ मुद्द्यावर बोला. जेव्हा आपली लढाई तेव्हा बोंब पाडा. असं थेट प्रती आव्हान उमेश पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना दिलं आहे.
गिरीश महाजनांवर निशाणा
गिरीश महाजन स्वतः ला संकट मोचक समजत असतील. तर 22 वर्षापासून विधानसभेत काय केलं? त्या ठिकाणी मुका माणूस जरी बसवलं असता, तो बोलायला लागला असता.. मात्र हे शेतकऱ्यांच्या समस्यांवर, सर्वसामान्यांच्या समस्यावर हे काहीच बोलत नाहीत? असा सवाल उन्मेश पाटील यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांनी जिल्हा दूध संघ ताब्यात घेतला. जिल्हा बँक ताब्यात घेतली, याचं जसा तुम्ही श्रेय घेता. तसं शेतकरी असतील, दूध उत्पादक असतील यांना न्याय मिळवून दिला पाहिजे.शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नसेल. सर्वात निचांकी भाव मिळत असेल तर मंत्री साहेब या मागण्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या, असा टोलाही उन्मेश पाटील यांनी लगावला आहे.