ठाकरेंचा भाजपला दे धक्का…; ‘तो’ नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती

BJP Leader Unmesh Patil may Be Inter in Shivsena Uddhav Thackeray Group : उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. भाजपचा 'तो' बडा नेता शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोण आहे हा नेता? वाचा सविस्तर...

ठाकरेंचा भाजपला दे धक्का...; 'तो' नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 12:29 PM

देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संजय राऊत यांच्याशी ते प्राथमिक चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबतचा निर्णय पक्का करतील, अशी माहिती आहे.

उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार?

उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे तीन पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारलं

भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच उन्मेष पाटील नाराज झाले. उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे तिघे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चारही जणांपैकी एक असणारे करण पवार यांनी टीव्ही 9 शी फोनवरून बोलताना या बातमीला दुजोरा दिला.

विद्यमान खासदार यांच्यासह दोन पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात होणार असल्याची माहिती करण पवार यांनी दिलीय. एकनाथ खडसेंच्या सोबत पण आले नव्हते. तेवढे कार्यकर्ते भाजपसोडून ठाकरे गटात प्रवेश करतील. आज किंवा उद्या या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहे, असंही करण पवार यांनी सांगितलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.