जयंत पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका, म्हणाले, विरोधकांना…
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
रवी गोरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील मेळाव्यात कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष बळकटीसाठी हा मेळावा होता, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर जयंत पाटील म्हणाले, शिंदे सरकार हे नवीन सरकार आलं. विरोधकांना निस्तनाबुत करण्याचं काम केलं जात आहे. ज्या पायावर हे सरकार उभे राहिला आहे त्याला कोणतं नैतिक अधिष्ठान नाही, अशी टीका त्यांनी केली.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, जे आमदार उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून गेलेत. त्यांच्याविरोधात जनमत महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील जनता आहे.
जयंत पाटील हे ऋतुजा लटके यांच्या अंधेरी पोटनिवडणुकीवर म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडून खोटे आरोप करण्यात आलेत.
एका महिलेच्या विरोधात किती कारवाया, किती कृत्य हे भाजप शिंदे सरकार करते. हे अंधेरीची जनता मान्य करणार नाही. जेवढा विरोध लटके यांचा हे करतील ते तेवढा मोठा पराभव या भाजप आणि शिंदे गटाचा होईल, असा आरोप जयंत पाटील यांनी लावला.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे नाहीत तर या सरकारला वेळ नाही. या सरकारला शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नाही. त्यामुळे या सरकारलाच आता मर्यादित वेळ आहे. या सरकारचे दिवस मर्यादित आहेत. दिवसात जेवढं काही करायचं आहे तेवढं काम हे सरकार करत आहे.
जयंत पाटील म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह गोठले. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेतलं. धनुष्यबाणही हिसकावून घेतला. उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडले नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांची मशाल हे लोकप्रिय झाली. मशाल बदलण्याचा यांनी प्रयत्न केला तर तेही लोकप्रिय होईल. चिन्हाला काही महत्त्व नाही भावनेला महत्त्व आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला महाराष्ट्रात महत्त्व आहे, असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या आंदोलनाबाबत, इथल्या पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. ही दुर्दैव आहे की, येथील पोलीस अधिकारी दबावाखाली काम करतात, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.