“पहाटे चारला उठलो, पण बसच वेळेत आल्या नाहीत”, मोदींच्या ‘लखपती दीदीं’च्या कार्यक्रमापासून शेकडो महिला वंचित
या महिलांना नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता होती. पण उशिरा पोहोचल्याने प्रशासनाच्या नियोजनावर महिलांनी नाराजी व्यक्त केली.
Lakhpati Didi Sammelan Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या आहेत. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला. मात्र आता जळगावात ‘लखपती दीदीं’च्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास उशीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील ‘लखपती दीदी’ कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी अनेक महिलांना उशीर झाला. या महिलांना ने-आण करण्यासाठी 2600 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बस उशीरा आल्या. त्यात रस्त्यात वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे जळगावातील कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याची तक्रार काही महिलांनी केली आहे. या सर्व महिला मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील असल्याचे बोललं जात आहे.
आम्ही पहाटे चार वाजता उठलो. सर्व तयारी केली. मात्र कार्यक्रम स्थळी घेऊन जाणाऱ्या बस उशिरा आल्या. त्यातच रस्त्यात वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे यायला उशीर झाल्याचे सांगत महिलांनी नाराजी व्यक्त केली. हा कार्यक्रम ज्या महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता, त्याच महिला या शेकडो महिला कार्यक्रमापासून वंचित राहिल्या.
“…म्हणून वेळेवर पोहोचता आलं नाही”
या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने महिलांना तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत पायी चालत जावे लागले. या महिलांना नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता होती. पण उशिरा पोहोचल्याने प्रशासनाच्या नियोजनावर महिलांनी नाराजी व्यक्त केली. या महिला मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर मतदार संघातील असून त्यांना कार्यक्रमाला वेळेवर पोहोचता आले नाही.
या महिलांना ने-आण करण्यासाठी तब्बल 2600 बसेसची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र ढिसाळ नियोजनामुळे तर दुसरीकडे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने बसेस कार्यक्रमस्थळी पोचण्यास उशीर झाला. आम्ही नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलो. मात्र उशीर झाला. त्यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली.
“महिलांमध्ये नाराजीचे वातावरण”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेला लखपती दिदी हा कार्यक्रम अर्धा झाला, तरीही काही महिला कार्यक्रमस्थळी दाखल होत असल्याचेच चित्र पाहायला मिळाले. बसेसच्या नियोजन शून्य व्यवस्थेमुळे शेकडो महिला कार्यक्रमाला पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते.