Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Accident | धावत्या बसवर झाड कोसळले, जळगावात भीषण अपघात, 12 प्रवाशी जखमी

यावल आगाराची बस क्रमांक (एमएच 20, बीएल 2542) यावलकडून भुसावळकडे जात असताना शहरापासून सुमारे दोन किलोमीटर लांब असलेल्या भुसावळ रस्त्यावरील पाटचारीजवळ अचानक मोठे झाड बसवर कोसळले

Jalgaon Accident | धावत्या बसवर झाड कोसळले, जळगावात भीषण अपघात, 12 प्रवाशी जखमी
जळगावात एसटी बसवर झाड कोसळलंImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 7:36 AM

जळगाव : धावत्या बसवर अचानक झाड (Tree fell on Bus) कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Accident) यावल भुसावळ रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या हतनुर धरणाच्या पाटचारीजवळ हा प्रकार घडला. प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एमएच 20, बीएल 2542) बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. एसटी चालकाने वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अपघात टळला. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल आगाराची बस क्रमांक (एमएच 20, बीएल 2542) यावलकडून भुसावळकडे जात असताना शहरापासून सुमारे दोन किलोमीटर लांब असलेल्या भुसावळ रस्त्यावरील पाटचारीजवळ अचानक मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह 12 प्रवाशी यात जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमी प्रवाशांची नावं काय?

या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन रा. यावल, इच्छाराम टिकाराम राजपूत (वय-70) रा. सांगवी खुर्द, पंडित लक्ष्मण परणकर (वय-66) रा. यावल, शकुंतला विलास चौधरी (वय-60) रा. धानोरा, सुशिलाबाई किसन धनगर (वय-60) रा. मुक्ताईनगर, जोवरा रशीद खाटीक (वय-50) रा. आडावद, सुरेश पंढरीनाथ महाजन (वय-52), पद्माबाई रमेश कोळी (वय-50), मंगला रामदास चौधरी (वय-55), कल्पना संतोष चौधरी (वय-55), दीपक येवलू वानखेडे (वय-24), आणि आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय-17) असे 12 जण जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल एसटी आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली व सर्व जखमी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली.

जखमींवर वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.बी.बारेला व वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी तात्काळ जखमी प्रवाशांवर प्रथम उपचार केले. यावल ते फैजपुर मार्गावर देखील अशाच प्रकारचे रस्त्याच्या दोघ बाजुस अनेक मोठमोठी झाडे हे कोसळण्याच्या मार्गावर असुन , यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळी दखल न घेतल्यास पावसाळ्यात मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.