आरोपांची राळ, ठिय्या आंदोलन अन् रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत… उमेदवार का झाले आक्रमक

Bodwad Police Station : राज्यात निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राजकीय वातावरण तापल्याने शा‍ब्दिकच नाही तर काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहे. अशाच एका प्रकरणात बोदवड पोलीस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा दिसला. उमेदवाराने ठिय्या आंदोलन करत रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत बसवली.

आरोपांची राळ, ठिय्या आंदोलन अन् रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत... उमेदवार का झाले आक्रमक
रोहिणी खडसे आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 10:06 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तसा एकमेकांवर शा‍ब्दिक हल्लेच नाही तर काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. अशाच एका प्रकरणात बोदवड पोलीस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा दिसला. उमेदवाराने ठिय्या आंदोलन करत रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत बसवली. याठिकाणी रात्री कार्यकर्त्यांसह खिचडी खाल्ली. पोलीस कारवाई करत नसल्याने असे अनोखे आंदोलन करण्यात आले. त्याची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.

रोहिणी खडसे आक्रमक

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी पण या मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. गावोगावी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. मतदारसंघात गुंडगिरी वाढल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. सध्या या मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाकडून एकनाथराव खडसे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. त्याला रोहिणी खडसे प्रत्युत्तर देत आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप रोहिणी खडसे केला आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. ठिय्यादरम्यान रोहिणी खडसेंनी पोलीस ठाण्यातच पंगत मांडली आणि खिचडी खाल्ली. रात्री उशीरा हा हायहोल्टेज ड्रामा सुरू होता. या आंदोलनाची आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

बोदवडमधील जलचक्र तांडा येथे रोहिणी खडसे यांची रॅली सुरू होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे रोहिणी खडसे यांचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात कारवाई होत नसल्याने खडसे यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. या सर्व प्रकारावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रात्री रॅली दरम्यान 9 वाजता आपल्या काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. जलचक्र तांडा येथे हा प्रकार घडला. मारहाणी झाले ते कार्यकर्ते आता बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला आले आहेत. मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आमची इतकीच आपेक्षा आहे की ज्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

मतदारसंघात वाढली गुंडगिरी

मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधून खडसे यांच्यावर शा‍ब्दिक हल्ले सुरू आहेत. त्यावर त्यांनी निशाणा साधला. पोलीस ठाण्यात कारवाई होत नसल्याने रात्री रोहिणी खडसेंनी कार्यकर्त्यांसह रात्रभर ठिय्या केला. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.