“आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललो आहोत आम्ही खुद्दार आहोत” ; शिवसेनेच्या नेत्याने एकाच वाक्यात ठाकरे गटावर पलटवार केला
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले होते की, गुलाबराव पाटील हे सकाळी वेगळे आणि रात्री वेगळं बोलतात मात्र रात्री का वेगळे बोलतात हे सर्वांना माहिती आहे अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नुकताच महाडमध्ये अलोट गर्दीत सभा झाली. त्या सभेत उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यानी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शिवसेनेवर टीका करताना जहरी टीका केली. यावेळी ते म्हणाले की, गद्दारांना लाथ मारून बाहेर काढा अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे. सुभाष सरदेसाई यांनी शिवसेनेवर टीका करताच आता त्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाडच्या सभेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची मला गरज वाटत नाही अशा खोचक शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना त्यांनी गद्दार शब्द ज्यांच्यासाठी वापरला जातो, त्यांच्यासाठी गद्दार हा शब्द योग्य नाही तर त्यांच्यासाठी खुद्दार आहोत अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांचे समर्थन केले आहे.
ज्यांनी आपले विचार सोडले, झेंडा सोडला, पक्ष प्रमुख पद सोडले त्यांना गद्दार म्हटलं जातं मात्र आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललो आहोत आम्ही खुद्दार आहोत अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे.
सुभाष सरदेसाई यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली असली तरी आम्ही भगवा सोडलेला नाही असंही त्यांनी त्यांना ठणकावून सांगितले आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी खोचकपणे निशाणा साधला आहे.
गद्दारांना लाथ मारून बाहेर काढा असे वक्तव्य सुभाष सरदेसाई यांनी महाड येथील सभेत केले होते त्यावरून गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे.
त्यामुळे त्याचबरोबर त्यांनी आदित्य ठाकरे यांचाही समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले होते की, गुलाबराव पाटील हे सकाळी वेगळे आणि रात्री वेगळं बोलतात मात्र रात्री का वेगळे बोलतात हे सर्वांना माहिती आहे अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर खोचकपणे टीका केल्याने आता ठाकरे गटाचा आणि शिवसेनेचा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.