“सरकारवर टीका टिपणी केली तर विरोधकांना न बोलू देणे हे ह्या सरकारचं काम”; जयंत पाटील प्रकरणावरून या नेत्याने सरकारचे वाभाडेच काढले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केला आहे. सरकारला विचारण्यात आलेले प्रश्न अडचणीचे ठरत आहे.
जळगावः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी पासूनच विरोधकांनी सरकारला घेरण्याची जय्यत तयारी केली होती. सीमावाद, जमीन घोटाळा अशा एक ना अनेक प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात होता. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबन करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या सरकारकडून विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
त्यामुळेच या सरकारने आमदार जयंत पाटील यांचे निलंबन केले असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केला आहे. सरकारला विचारण्यात आलेले प्रश्न अडचणीचे ठरत आहे.
त्यामुळेच विरोधकांवर निलंबनाची कारवाई वगैरै केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारवर टीका टिपणी केली तर विरोधकांना न बोलू देणे हे या सरकारचं काम आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आमदार जयंत पाटील हिवाळी अधिवेशनापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनाथ विरोधकांनी आवाज उठविला आहे. जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, जयंत पाटील यांनी जो प्रश्न विचारला असेल तो सरकारला विचारला आहे.
त्यामुळे त्यांनी तो वैयक्तिक अथवा व्यक्तिगत घेता कामा नये. जयंत पाटील यांनी जो प्रश्न विचारला आहे तो कोणत्याही व्यक्तिगत माणसाला प्रश्न विचारला नव्हता तर तो सरकारकडे उपस्थित केला होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांना थेट निलंबित करणे चुकीचे आहे.
जो त्यानी शब्द वापरला होता. तो काही व्यक्तिगत नव्हता. त्यामुळे शब्द असंवेदनशील असतील तर ते सभागृहाच्या पटलावरून हटवता येऊ शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे जयंत पाटील यांना एवढ्या मोठा प्रमाणावर शिक्षा देणे हे योग्य नसून सरकारचे वाभाडे काढण्यासाठी विरोधी पक्ष हा आक्रमक झाला आहे त्यामुळे सरकारकडून हे असे केले जात आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.