MNS : ‘प्रसाद’ मिळताच पगार कामगारांच्या हातात; मनसे स्टाईल आंदोलनाची जळगावमध्ये चर्चा, व्यवस्थापकाच्या लगावली नेत्याने कानशिलात
MNS Leader Slap Manager at Jalgaon MIDC : जळगाव एमआयडीसीमध्ये मनसे नेत्याने परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसे स्टाईलने प्रसाद देण्यात आला.

जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत चांगलाच राडा झाला. मराठी कामगारावर वारंवार अन्याय होत असल्याने मनसेने या कंपनीत धडक दिली. त्यांनी यावेळी परप्रांतीय व्यवस्थापकाकडे जाब विचारला. त्याच्या उत्तरावर मनसे नेत्याचे समाधान झाले नाही. तर दुसरीकडे कामगारांवरील अत्याचाराचा पाढा वाचण्यात आला. त्यांचे पगार थकल्याचे समोर आले. त्यानंतर मनसे नेत्याने व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. त्यावरून एकच गोंधळ उडाला.
व्हिडिओ झाला व्हायरल
जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या समोर आले. याविषयीचा जाब मनसे नेत्यांनी कंपनीकडे विचारला. मनसे शहराध्यक्षांनी परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.




कामगारांचा पगार अडवला
कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगारांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. कामगारांचा तब्बल दोन महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी थेट कंपनीत जाऊन परप्रांतीय व्यवस्थापकाला जाब विचारत त्याचा कानशिलात लगावली.
प्रसाद मिळताच थकलेला पगार हातात
दोन महिन्यांपासून पगार देत नाही तसेच पार्सल पॅकिंग मध्ये मराठी मुलांवर चुकीचा तसेच चोरीचा आरोप करत असल्याची तक्रार कामगारांनी मनसेकडे पदाधिकार्यांकडे केली होती. कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगारांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. कामगारांचा तब्बल दोन महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मनसे स्टाईलमध्ये केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकाने मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळाली आहे.
या मराठी कामगारांना पगार तत्काळ मिळावा तसेच या ठिकाणी सुरू असलेले चुकीचा प्रकार लागलीच थांबवावा या शब्दात मनसेच्या पदाधिकार्यांनी परप्रांतीय व्यवस्थापकाला दम भरला आहे. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याची एमआयडीसीमध्ये चर्चा रंगली आहे.